महाराष्ट्रातील समता चळवळीचे अध्वर्यू प्राचार्य राजाराम राठोड यांचं दु:खद निधन

महाराष्ट्रातील समता चळवळीचे अध्वर्यू प्राचार्य राजाराम राठोड यांचं दु:खद निधन

वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय अध्यक्ष, समाजभूषण प्राचार्य राजारामजी राठोड यांचे आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक: 10 जुलै 2026 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता वसंतराव नाईक महाविद्यालय परिसर, जालना रोड सिडको, छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे.

 मराठवाडा प्रदेशातील उच्चशिक्षण क्षेत्रातील एक अतिशय प्रभावशाली प्राचार्य , महाराष्ट्रातील समता चळवळीचे अध्वर्यू , वसंतराव नाईक महाविद्यालय, औरंगाबादचे संस्थापक सचिव , दुबळ्या घटकातील गोरगरीब मुलांचे आधारवड , भटक्यविमुक्तांची चळवळ , नामांतर लढा आणि अनेक प्राध्यापक कार्यकर्त्यांचे पाठीराखे , अतिशय मोहक व्यक्तित्वाचे धनी , उत्तम चिंतक प्राचार्य राजाराम राठोड यांचं निधन म्हणजे मराठवाड्यातील धगधगत्या शैक्षणिक नेतृत्वाचा अंत होणं होय. आता असे समाजधर्मी व गरीबहितैषि प्राचार्यांची वाणवा आहे. 

मूळ उदगीरच्या तांड्यावर जन्मलेले राठोड सर अभ्यासात हुशार , नांदेडच्या प्रागतिक शैक्षणिक वातावरणात फुललेलं व्यक्तित्व, समाजसेवेची मनस्वी आवड . यातून एक चिंतनशील प्राचार्य घडले. धाडसानं वसंतराव नाईक यांचे नावे महाविद्यालय औरंगाबादला मोठ्या जिद्दीनं उभा करतात नि हजारो गोरगरीब -वंचित -भटकेविमुक्त यांचं जीवनात परिवर्तन आणतात. एक कर्मवीर प्राचार्य काय करू शकतो याचा ते मूर्तिमंत उदाहरण बनतात. आदरणीय प्राचार्य राजाराम राठोड सरांना विनम्र आदरांजली..!

स्रोत - गुरुवर्य प्रो. डॉ. सुधीर गव्हाणे यांची फेसबुक वॉलवरून 

IMG-20260624-WA0054

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रातील समता चळवळीचे अध्वर्यू प्राचार्य राजाराम राठोड यांचं दु:खद निधन महाराष्ट्रातील समता चळवळीचे अध्वर्यू प्राचार्य राजाराम राठोड यांचं दु:खद निधन
वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय अध्यक्ष, समाजभूषण प्राचार्य राजारामजी राठोड यांचे आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी दुपारी 1...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात सुनील डोके यांच्या ‘बाप’ कवितेचा समावेश
"पासपोर्ट म्हणजे काय 'बसचं तिकीट'? निवडणूक आयोग व्यवस्थेच्या पोटातलं 'स्वतंत्र साम्राज्य' बनू पाहतंय का ?" : माजी न्यायमूर्ती मदन लोकूर
राजकीय पदाधिकारी, शासकीय नोकरदार , करदाते यांना कर्जमाफी मिळणार नाही......शेतकरी कर्जमाफी कुणाला मिळणार नाही? राज्य सरकारकडून यादी जाहीर
नीट प्रणाली बदलणार....... आता पेपर सेटरला सुद्धा कळणार नाही....काय आहे जाणून घ्या नवीन सिस्टीम
३ मे रोजी घेण्यात आलेली ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षा रद्द ; पुन्हा एकदा परीक्षा घेणार, CBI चौकशी चे आदेश, पुनर्परीक्षेची फीस घेणार नाही.... मात्र तरीही विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले : सेंटर तेच हॉल तिकीट नवीन येणार
खरात सोबत कोणकोणत्या पूजा केल्या ? SIT कडून चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार, खरातसंबंधी कोणकोणते प्रश्न विचारले? वाचा सविस्तर
Join Us on Whatsapp