२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन

 २३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर, दि. १९ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध अभ्यासकेंद्रांमार्फत विद्यापीठाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘कुलगुरू यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू मा.प्रो. डॉ.संजीव सोनवणे हे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदल, मुक्त व दूरस्थ शिक्षणातील नवीन संधी, अभ्यासक्रमातील सुधारणा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीशी संबंधित विविध बाबींची माहिती या संवादातून मिळणार आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन कला, वाणिज्य महाविद्यालय, औरंगपुरा येथील भूमकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या संवाद कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षणक्रमांच्या अभ्यासकेंद्रांवरील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमास संबंधित अभ्यासकेंद्रांचे केंद्रप्रमुख (प्राचार्य) व केंद्रसंयोजक यांनीही उपस्थित राहावे, अशी सूचना विद्यापीठाच्या विभागीय केंद्राकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रक्रियेबाबत थेट कुलगुरूंशी संवाद साधण्याची आणि आपल्या अडचणी, शंका व अपेक्षा मांडण्याची संधी या कार्यक्रमामुळे उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेशी परिचित करून देणे, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देणे आणि विद्यापीठ व विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश असल्याचे मानले जात आहे.

विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहून या संवाद कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नंदकुमार राठी, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, विभागीय केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

IMG-20260624-WA0054

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 २३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन २३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर, दि. १९ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध अभ्यासकेंद्रांमार्फत विद्यापीठाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या...
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
महाराष्ट्रातील समता चळवळीचे अध्वर्यू प्राचार्य राजाराम राठोड यांचं दु:खद निधन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात सुनील डोके यांच्या ‘बाप’ कवितेचा समावेश
"पासपोर्ट म्हणजे काय 'बसचं तिकीट'? निवडणूक आयोग व्यवस्थेच्या पोटातलं 'स्वतंत्र साम्राज्य' बनू पाहतंय का ?" : माजी न्यायमूर्ती मदन लोकूर
Join Us on Whatsapp