बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांची अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर:- ( प्रतिनिधी )
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था 'बालरंगभूमी परिषद' महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि बालदोस्तांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्राच्या मातीला शौर्याचा, त्यागाचा आणि सुशासनाचा मोठा वारसा लाभला आहे. परिषदेतर्फे महाराष्ट्राचा इतिहास हा उपक्रम राबवला जात आहे आणि या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षीचा विषय लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होता. आपल्या प्रजाहितदक्ष कारभाराने आणि दातृत्वाने अवघ्या भारताला दिशा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अद्वितीय जीवन प्रवासावर आधारित एकपात्री, नाट्यछटा, स्वगत, नाटिका सादरीकरण बाल कलाकारांनी केले. प्राथमिक फेरी दि. २ ऑगस्ट २०२६, रोजी रविवार सकाळ ९:३० वाजता मित्र भा. बा. आर्वीकर सभागृह, जीवन विकास ग्रंथालय, टिळक नगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झाली. या महोत्सवात सर्व सहभागी कलाकारांना प्रशस्तीपत्र आणि पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. या महोत्सवाची अंतिम फेरी: दि. ९ ऑगस्ट २०२६, माऊली सभागृह, अहिल्यानगर येथे होणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट सादरीकरण ठरलेल्या बालकलाकाराची व संघाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली . 
मोठा गट सर्वोत्कृष्ट वीरा चांदोडकर, उत्कृष्ट पारितोषिक स्वरा उमेश साळवे आणि उत्तम पारितोषिक श्रावणी विनोद कुमार पाटील यांना पारितोषिक देण्यात आले
छोटा गट- सर्वोत्कृष्ट गार्गी नरेंद्र मानकर, उत्कृष्ट अभिधा अर्चना पोहनेरकर आणि उत्तम स्वरा सुजय धर्माधिकारी यांना पारितोषिक देण्यात आले तर सांघिक शारदा मंदिर कन्या शाळा या शाळेला सर्वोकृष्ट देण्यात आले.
कार्यक्रमाचे स्पर्धेचे परीक्षण प्रा. रमेश धोंडगे व राहुल काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक छत्रपती संभाजीनगर शाखेचे जिल्हाध्यक्ष आसेफ शेख यांनी केले सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह गोकुळ गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष (प्रशासन) प्राचार्य हसन इनामदार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष विनोद आघाव, सहकार्यवाह अर्चना देवधर, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण अहिरे, रमेश सोळुंके, श्रीपाद पदे, मराठवाडा युवा संघटक अभिजीत भातलौंढे, ओम बेलेकर यांनी परिश्रम घेतले.

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List