कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  

 

कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते. केवळ कागदावरील क्वालिफिकेशन अर्थात पदव्या महत्त्वाच्या नसून, स्वतःमध्ये क्षमता निर्माण करून ती सातत्याने विकसित केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात रंगकर्मी प्रा. दिलीप घारे यांनी केले.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धाराशिव जिल्हा युवक महोत्सवाचा समारोप बुधवारी (दि. दोन) सायंकाळी थाटात करण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या युवा कलावंतांनी जल्लोषात पारितोषिके स्वीकारली. कळंब येथील ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा संचलित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात १ व २ सप्टेंबर रोजी महोत्सव झाला. महोत्सवाचे उद्घाटन आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांच्या हस्ते व कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाला.  तर समारोप संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ .अंकुश कदम,  विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंभुरे, प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, अधिसभा सदस्य डॉ.संजय कांबळे,  डॉ.सतीश गावित हे उपस्थित होते. संयोजन समिती सदस्य डॉ.दिलीप महालिंगे, डॉ.किशोर शिरसाट, डॉ.शशिकांत पाटील, सांस्कृतिक समन्वयक डॉ दत्ता साकोळे आदींसह संयोजन समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. ज्ञान प्रसारक मंडळ या संस्थेचा अमृत महोत्सव आणि संस्थापक शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांची जन्मशताब्दी या अनुषंगाने युवक महोत्सवाचे यजमानपद संस्थेने घेतले आहे, असे संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर म्हणाले. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम, स्पर्धा व वर्षअखेरीस समारोप सोहळा होणार आहेत असे अध्यक्षीय समारोपात प्रा आबासाहेब बारकूल म्हणाले. विद्यार्थ्यांनी केवळ चांगली नोकरी मिळविण्याचे ध्येय न ठेवता एक चांगला माणूस होण्याचे ध्येय ठेवावे. ज्ञानासोबत विवेक, कौशल्यासोबत संवेदनशीलता आणि यशासोबत नम्रता जोपासावी, असा संदेशही प्रा बारकूल यांनी यांनी दिला.  धाराशिव जिल्ह्यातील पारितोषिक विजेते प्रथम तीन संघाना केंद्रीय युवक महोत्सवात सहभाग मिळणार आहे. हा महोत्सव गणेश महोत्सव नंतर घेण्यात येईल. केंद्रीय युवक महोत्सव डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये ५ ते ७ ऑक्टोबर या दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी दिली.

FB_IMG_1788378957422
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुंजीच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या महोत्सवात जिल्हाभरातून ४४ महाविद्यालयांचे ४५७ युवा कलावंत सहभागी झाले. महाविद्यालयांच्या परिसरात चार रंगमंचावर स्पर्धा संपन्न घेण्यात आली. डॉ.दादाराव गुंडरे यांनी सूत्रसंचालन तर उपप्राचार्य डॉ.के.डी.जाधव यांनी आभार मानले. समारोप कार्यक्रमास प्राध्यापक, परीक्षक, कर्मचारी, आयोजक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 निकाल : धाराशिव जिल्हा युवा महोत्सव २०२६ : निकाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर
आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, ता. कळंब, जिल्हा धाराशिव
आयोजित
धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
कला प्रकारानुसार अंतिम निकाल
-----------
संगीत विभाग उत्कृष्ट संघ
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर

नृत्य विभाग उत्कृष्ट संघ
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब

नाट्य विभाग उत्कृष्ट संघ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव

वाङ्मय विभाग उत्कृष्ट संघ
साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन रंजन, कळंब

ललित विभाग उत्कृष्ट संघ
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी

FB_IMG_1788378924054

शोभायात्रा
प्रथम  :- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी
द्वितीय :-आदर्श महाविद्यालय, उमरगा
तृतीय  :-शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम

संगीत विभाग

भारतीय शास्त्रीय तालवाद्य (वैयक्तिक)
प्रथम  :-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब
द्वितीय :-तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, धाराशिव
तृतीय  :-छत्रपती शिवाजी महाविद्यालय, कळंब

भारतीय सुगम गायन (वैयक्तिक)
प्रथम  :-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी
द्वितीय :-जवाहर महाविद्यालय,अणदूर
तृतीय  :-शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम

FB_IMG_1788378900946

भारतीय समूह गायन (सांघिक)
प्रथम  :-यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर
द्वितीय :-रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव
तृतीय  :-ऍडव्हान्स कॉम्प्युटर कॉलेज, धाराशिव

II. नृत्य विभाग

लोक आदिवासी नृत्य (सांघिक)
प्रथम  :-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब
द्वितीय :-जवाहर महाविद्यालय अणदूर
तृतीय  :-कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग

भारतीय शास्त्रीय नृत्य (वैयक्तिक)
प्रथम  :-बाद
द्वितीय :-बाद
तृतीय  :-बाद

III. नाट्य विभाग

एकांकिका - (सांघिक)
प्रथम  :-शिक्षण महर्षी गुरुवर्य आर जी शिंदे महाविद्यालय परांडा
द्वितीय :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव
तृतीय  :-संतराम लोमटे वरिष्ठ महाविद्यालय, तुळजापूर

प्रहसन (सांघिक)
प्रथम  :-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब
द्वितीय :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरीसर धाराशिव
तृतीय  :-शिक्षण महर्षी गुरुवर्य आर.जी. शिंदे महाविद्यालय परांडा

FB_IMG_1788378876865

नकला (वैयक्तिक)
प्रथम  :-श्रीकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव
द्वितीय :-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब
तृतीय  :-तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव

मूकाभिनय (सांघिक)
प्रथम  :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव
द्वितीय :-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी
तृतीय  :-यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर

IV. ललित कला विभाग

रांगोळी (वैयक्तिक)
प्रथम  :-श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा
द्वितीय :-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी
तृतीय  :-श्री साई जनविकास प्रतिष्ठान बी.एड महाविद्यालय आळणी

चित्रकला (वैयक्तिक)
प्रथम  :-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी
द्वितीय :-बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट धाराशिव
तृतीय  :-संतराम लोमटे वरिष्ठ महाविद्यालय, रंजन, कळंब

FB_IMG_1788378841215

कोलाज (वैयक्तिक)
प्रथम  :-अपात्र
द्वितीय :-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब
तृतीय  :-डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय धाराशिव

पोस्टर (वैयक्तिक)
प्रथम  :-यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर
द्वितीय :-वसंतराव काळे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट कळंब
तृतीय  :-श्रीकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव

मृदमूर्तीकला (वैयक्तिक)
प्रथम  :-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी
द्वितीय :-श्री माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम
तृतीय  :-भाऊसाहेब बिराजदार वरिष्ठ महाविद्यालय बालसूर

व्यंगचित्र (वैयक्तिक)
प्रथम  :-कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग
द्वितीय :-श्री शिवाजी महाविद्यालय परंडा
तृतीय  :-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब

स्पॉट फोटोग्राफी (वैयक्तिक)
प्रथम  :-श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा
द्वितीय :-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी
तृतीय  :-श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी

इन्स्टॉलेशन
प्रथम  :-यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर
द्वितीय :-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी
तृतीय  :-........

लघुपट (समूह)
प्रथम  :-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ के टी पाटील कॉलेज ऑफ फार्मसी धाराशिव
द्वितीय :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव
तृतीय  :-बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट धाराशिव

. साहित्य विभाग

वक्तृत्व (वैयक्तिक)
प्रथम  :-जवाहर महाविद्यालय अणदूर
द्वितीय :-साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, रंजन, कळंब
तृतीय  :-ॲडव्हान्स कॉम्प्युटर कॉलेज धाराशिव

वादविवाद (सांघिक)
प्रथम  :-साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन रंजन, कळंब
द्वितीय :-के.टी. पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स धाराशिव
तृतीय  :-रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव

प्रश्नमंजुषा (सांघिक)
प्रथम  :-क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील समाजकार्य महाविद्यालय धाराशिव
द्वितीय :-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ के. टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी धाराशिव
तृतीय  :-बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट धाराशिव

उत्कृष्ट अभिनय पुरुष
प्रथम :- ज्ञानेश्वर शिवाजी भागडे, शिक्षण महर्षी गुरुवर्य आर.जी. शिंदे महाविद्यालय परांडा
द्वितीय:-अविनाश शिंदे-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव
तृतीय:- शंतनू देडे-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव

उत्कृष्ट अभिनय -स्री

प्रथम  :-साक्षी गायकवाड-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव
द्वितीय :-दिव्या निंबाळकर-शिक्षण महर्षी गुरुवर्य आर.जी.शिंदे महाविद्यालय परांडा
तृतीय  :-दिव्या थोरात-शिक्षण महर्षी गुरुवर्य आर. जी. शिंदे महाविद्यालय परांडा

उत्कृष्ट दिग्दर्शन
प्रथम  :-आदेश बारस्कर-शिक्षण महर्षी गुरुवर्य आर.जी. शिंदे महाविद्यालय परंडा
द्वितीय :- सुमेध चिलवंत-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव
तृतीय  :-प्रांजली जाधव -भानुदास राव चव्हाण महाविद्यालय लोहारा

IMG-20260624-WA0054

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp