प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन

प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ, लेखिका आणि मराठी भाषा-अभ्यासक प्रा. यास्मिन शेख तसेच प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या निधनाने भाषा, साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद, जिल्हा शाखा-छत्रपती संभाजीनगर, साहित्य भारती-छत्रपती संभाजीनगर आणि त्रैमासिक तिफन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही श्रद्धांजली सभा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता, ग्रामविकास भवन, राष्ट्रमाता जिजाऊ चौक, एन-२, ठाकरेनगर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

प्रा. यास्मिन शेख यांनी मराठी व्याकरण, भाषा-अभ्यास आणि मराठी भाषा विकासाच्या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. मराठी भाषेच्या शुद्धतेसाठी, संवर्धनासाठी आणि समृद्धीसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी भाषा-अभ्यासाच्या क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी आपल्या कुंचल्यातून कलाविश्व समृद्ध केले. त्यांची सर्जनशील दृष्टी, कलासाधना आणि चित्रकलेतील योगदान रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने चित्रकला क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे.

या श्रद्धांजली सभेचे अध्यक्षस्थान मा. डॉ. वासुदेव मुलाटे, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक, छत्रपती संभाजीनगर हे भूषविणार आहेत. प्रमुख उपस्थितांमध्ये मा. डॉ. सर्जेराव जिगे, मा. उमेश काळे, मा. डॉ. नागेश अंकुश आणि मा. डॉ. हबीब भंडारे यांचा समावेश आहे. प्रास्ताविक सुनील डोके, सूत्रसंचालन विजयकुमार पांचाळ आणि आभार डॉ. संजय शिंदे मानणार आहेत.

आयोजक व पदाधिकाऱ्यांचा सहभाग

या कार्यक्रमासाठी डॉ. शिवाजी हुसे (संपादक–त्रैमासिक तिफन), सुनील डोके (जिल्हाध्यक्ष), अशोक शेवगन (कार्याध्यक्ष), डॉ. जयश्री कुमावत (उपाध्यक्ष), विजयकुमार पांचाळ (उपाध्यक्ष), डॉ. दैवत सावंत (सचिव), माधुरी चौधरी (सहसचिव), डॉ. संजय शिंदे (संघटक), प्रा. नागेश बोंतेवाड (सहसंघटक), सुनिता कपाळे (कोषाध्यक्ष), प्रा. पंजाबराव मोरे (प्रसिद्धीप्रमुख) यांच्यासह संजय खाडे, संजय प्र. गायकवाड, उज्ज्वला कोंडके, प्रिया धारूरकर, वृषाली सोनवणे आणि गिरीश जोशी हे कार्यकारिणी सदस्य सहभागी आहेत.

साहित्य भारतीच्या वतीने प्रा. विजय पोहनेरकर (जिल्हाध्यक्ष), प्रा. डॉ. महेश खरात (कार्याध्यक्ष), प्रा. संजय संभाळकर (मंत्री), दिपाली कुलकर्णी, विनायक पवार, प्रा. डॉ. मनोहर बस बन्सवाल, शेषराव पठाडे, सारिका कुलकर्णी, मधुकर कांबळे, प्रा. तृप्ती रोंधे, डॉ. निलेश देगावकर आणि डॉ. संतोष देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी आहेत.

दोन्ही मान्यवरांच्या कार्याला आणि स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी साहित्यिक, कलावंत, भाषा-अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

file_000000005624821193190dcbf1763f2a

IMG-20260624-WA0054

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.11 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ, लेखिका आणि मराठी भाषा-अभ्यासक प्रा. यास्मिन शेख तसेच प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या निधनाने भाषा,...
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
महाराष्ट्रातील समता चळवळीचे अध्वर्यू प्राचार्य राजाराम राठोड यांचं दु:खद निधन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात सुनील डोके यांच्या ‘बाप’ कवितेचा समावेश
Join Us on Whatsapp