डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात सुनील डोके यांच्या ‘बाप’ कवितेचा समावेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात सुनील डोके यांच्या ‘बाप’ कवितेचा समावेश

डॉ

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या बी.ए. तृतीय वर्षाच्या मराठी अभ्यासक्रमात सुनील डोके यांच्या ‘पोशिंदा’ या काव्यसंग्रहातील ‘बाप’ या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण जीवनाचे वास्तव, शेतकरी जगण्यातील संघर्ष आणि कष्टकरी बापाच्या वेदनांना शब्दबद्ध करणाऱ्या या कवितेच्या समावेशामुळे जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून कवी सुनील डोके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मूळचे जालना जिल्ह्यातील बोरगाव येथील रहिवासी असलेले कवी सुनील डोके हे ग्रामीण जीवनाशी घट्ट नाळ जोडलेले साहित्यिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रला परिचित आहेत. त्यांनी आपल्या ‘पोशिंदा’ या काव्यसंग्रहातून शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष, दुष्काळाचे चटके, अवकाळी पावसाने केलेली हानी, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, हमीभावाचा प्रश्न, कर्जबाजारीपणा आणि शेतकरी कुटुंबांच्या भावविश्वाचे अत्यंत वास्तववादी आणि हृदयस्पर्शी चित्रण केले आहे.

‘बाप’ ही कविता एका कष्टकरी, त्यागी आणि संघर्षशील बापाच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करते. कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना तिलांजली देणारा, संकटांशी दोन हात करत संसाराचा गाडा ओढणारा आणि आयुष्यभर कष्टाची पेरणी करणारा ग्रामीण बाप या कवितेतून साकार झाला आहे. त्यामुळे ही कविता केवळ एका व्यक्तीची कहाणी न राहता मराठवाड्यातील लाखो शेतकरी बापांच्या जगण्याचे प्रतीक बनली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या कवितेची केलेली निवड ही ग्रामीण साहित्याच्या सामर्थ्याची आणि शेतकरी जीवनाविषयीच्या संवेदनशीलतेची पावती मानली जात आहे. बोरगावच्या मातीतील एका साहित्यिकाच्या कवितेला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळणे ही जालना जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी आणि संपूर्ण शेतकरी-कष्टकरी समाजासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरत आहे.

कवी सुनील डोके यांच्या या यशामुळे मराठवाड्यातील ग्रामीण साहित्याला नवी ओळख मिळाली असून शेतकरी जीवनाचे वास्तव शब्दबद्ध करणाऱ्या साहित्यकृतींनाही शैक्षणिक स्तरावर योग्य सन्मान मिळू शकतो, हा विश्वास अधिक दृढ झाला आहे. साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी कवी सुनील डोके यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

IMG-20260624-WA0054

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM

IMG-20240814-WA0257

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रातील समता चळवळीचे अध्वर्यू प्राचार्य राजाराम राठोड यांचं दु:खद निधन महाराष्ट्रातील समता चळवळीचे अध्वर्यू प्राचार्य राजाराम राठोड यांचं दु:खद निधन
वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय अध्यक्ष, समाजभूषण प्राचार्य राजारामजी राठोड यांचे आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी दुपारी 1...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात सुनील डोके यांच्या ‘बाप’ कवितेचा समावेश
"पासपोर्ट म्हणजे काय 'बसचं तिकीट'? निवडणूक आयोग व्यवस्थेच्या पोटातलं 'स्वतंत्र साम्राज्य' बनू पाहतंय का ?" : माजी न्यायमूर्ती मदन लोकूर
राजकीय पदाधिकारी, शासकीय नोकरदार , करदाते यांना कर्जमाफी मिळणार नाही......शेतकरी कर्जमाफी कुणाला मिळणार नाही? राज्य सरकारकडून यादी जाहीर
नीट प्रणाली बदलणार....... आता पेपर सेटरला सुद्धा कळणार नाही....काय आहे जाणून घ्या नवीन सिस्टीम
३ मे रोजी घेण्यात आलेली ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षा रद्द ; पुन्हा एकदा परीक्षा घेणार, CBI चौकशी चे आदेश, पुनर्परीक्षेची फीस घेणार नाही.... मात्र तरीही विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले : सेंटर तेच हॉल तिकीट नवीन येणार
खरात सोबत कोणकोणत्या पूजा केल्या ? SIT कडून चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार, खरातसंबंधी कोणकोणते प्रश्न विचारले? वाचा सविस्तर
Join Us on Whatsapp