आंतरवली सराटीत पोलिसांवर दगडफेकीचा प्लॅन राजेश टोपेंचा, सीबीआय चौकशीची मागणी

आंतरवली सराटीत पोलिसांवर दगडफेकीचा प्लॅन राजेश टोपेंचा, सीबीआय चौकशीची मागणी

जालना येथील आंतरवली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्लॅन शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी रचला होता, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेश टोपे यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणीही प्रतिष्ठाणकडून करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान पोलिस व आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीवरुन अवघे राज्य ढवळून निघाले होते. पोलिसांनी आंदोलकांवर अमानूष लाठीमार केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. तर, आंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीमार केला, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानने या घटनेवरुन राजेश टोपेंवर गंभीर आरोप केले आहेत.

आधीपासूनच रचला कट

देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी आरोप केला आहे की, पोलिसांवर दगडफेक करण्याचा आधीपासूनच प्लॅन करण्यात आला होता. आंदोलनात गरबड झाल्यास पोलिसांवर दगडफेक करण्याचे राजेश टोपे आणि त्यांच्या स्वीय सहायकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्लॅन होता. याबाबत प्रतिष्ठानकडून जालना पोलिस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले आहे.

बाहेरुन समाजकंटक आणले

पोलिसांना दिलेल्या निवेदनात देवेंद्र फडणीस प्रतिष्ठानने म्हटले आहे की, 1 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधवाचे उपोषण चालू होते. तेथे पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. या पोलिस बंदोबस्तामध्ये काही समाजकंटक व जातीवादी लोक बाहेर गावावरून आले होते. हे लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शहागड व बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील असून, या समाजकंटकांनी पोलिस बांधवावर घरावरती जाऊन दगडफेक केली. दगडफेक केल्यामुळे आंदोलन चिघळले आणि नाईलाजास्तव पोलीस बांधवाना लाठीचार्ज, अश्रूधुरांचा मारा करावा लागला.

राजेश टोपेंनी घेतली होती गुप्त बैठक

निवेदनात पुढे म्हटले आहे की, 27 ऑगस्ट रोजी आमदार राजेश टोपे व त्यांच्या कार्यकर्त्यांची अंकुश सहकारी साखर कारखाना येथे एक गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत मराठा समाज बांधवाच्या उपोषाणामध्ये काही गडबड झाली तर पोलिसांवर हल्ला करण्याचा प्लॅन आखला गेला होता. त्यामुळे, आमदार राजेश टोपे व त्यांचे स्वीय सहाय्यक, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलिस व सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी.

 राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001    WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PMIMG-20230903-WA0117

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp