शिंदे सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीच्या हातात, कधीही खेचतात, टाईट करतात - संजय राऊतांचा जोरदार टोला
शिंदे सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीच्या हातात आहे. दिल्लीवाले हा नाडा कधीही खेचतात, टाईट करतात, ढिल्ली करतात, असा जोरदार टोला आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारला लगावला.
शिंदे मध्यरात्रीही दिल्लीला जातात
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, राज्यातील शासकीय रुग्णालयांत गेल्या तीन दिवसांत शेकडो रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, सरकार कुठे आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे आहेत? तर शिंदे दिल्लीला जाऊन बसले आहेत. ते कधी गृहमंत्री अमित शहांना भेटायला जातात तर कधी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात बसलेले दिसतात. एकनाथ शिंदेंना बोलावले तर ते मध्यरात्रीही दिल्लीला जातात. याचे कारण म्हणजे या सरकारचे नाडे दिल्लीच्या हातात आहे. पाहीजे तेव्हा दिल्लीकडून हे नाडे खेचले जातात, टाईट केले जातात. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार दिल्लीला पळावे लागते.
नक्षलवादाहून आरोग्य व्यवस्थेमुळे अधिक बळी
संजय राऊत म्हणाले, राज्यातील शासकीय रुग्णालयात औषधांअभावी रुग्णांचे मृत्यू होत असताना नक्षलवाद्यांशी कसे लढायचे, हे ऐकण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेले आहेत. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जेवढे नागरिक मारले गेले नसतील त्यापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू हलगर्जीपणामुळे सरकारी रुग्णालयांत होत आहे. राज्य सरकार आपली ही जबाबदारी झटकू शकत नाही. मुख्यमंत्रीच दिल्लीला जाऊन बसत असतील तर इथे सरकार कोण चालवणार? दिल्लीला जाऊन राज्य सरकार नक्षलवाद काय उपटणार? आधी इथे नीट सरकार चालवून दाखवा.
उद्धव ठाकरेंनी कशी स्थिती हाताळली होती?
संजय राऊत म्हणाले, राज्यातील आरोग्य व्यवस्था अत्यंत वाईट झाली आहे. कोरोना काळात अवघ्या जगावर मोठे संकट उभे ठाकले असताना उद्धव ठाकरे सरकारने ही परिस्थिती उत्तमरित्या हाताळून दाखवली होती. कोरोनामुळे धारावी, मुंबईसारख्या ठिकाणी हाहाकार उडेल, असे सांगितले जात होते. वैद्यकीय तज्ज्ञ याबाबत चिंता व्यक्त करत होते. मात्र, उद्धव ठाकरे सरकारने या काळात लोकांची नीट काळजी घातली. खंबीरपणे प्रशासन चालवून दाखवले. अवघ्या जगाने, सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे सरकारच्या कामाची स्तूती केली. मात्र, आता परिस्थिती बिघडत चालली आहे. आरोग्य व्यवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सरकारचे लक्ष आमदजार, खासदारांच्या खरेदीकडेच लागलेले असते.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List