शरद पवार गटाची मोठी खेळी:अजित पवार गटाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी

शरद पवार गटाची मोठी खेळी:अजित पवार गटाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्षावर आज निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असतानाच शरद पवार गटाने मोठी खेळी केली आहे. शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

राष्ट्रवादीतील संघर्ष शिवसेनेच्या वाटेने

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा गटाच्या सर्व आमदारांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. अजितदादा गटाच्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी, या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील संघर्षही शिवसेनेच्याच वाटेने जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

अजितदादा गटाच्या अडचणी वाढणार

जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवार गटाच्या आमदारांच्या अडचणी वाढ होते का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

शरद पवारांचा निवडणूक आयोगावर आरोप

राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यापूर्वी शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर आपली भूमिका मांडली होती. आयोग एकांगी भूमिका घेत असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या वकिलांनी केला होता.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली नाही. विधीमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष हे वेगळे आहेत. तरीही निवडणूक आयोग राष्ट्रवादीत फूट पडली असल्याचे म्हणत आहे, असे शरद पवार गटाचे म्हणणे होते.

अजित पवार व समर्थकांनी केली होती बंडखोरी

अजित पवार यांनी गेल्या जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी केली होती. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी बड्या नेत्यांनीही शरद पवार यांची साथ सोडली होती. त्यानंतर ही मंडळी भाजप - शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाली. त्यात अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाले, तर अन्य आमदार कॅबिनेट मंत्री झाले. या घटनाक्रमानंतर या गटाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्हावर दावा सांगितला. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. तर, आता शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील संघर्ष आता निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टातही रंगणार आहे.

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

IMG-20230903-WA0117

 

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp