अखेर पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंदाजे ₹100 कोटी अपहार प्रकरणी चौकशी समिती गठीत; “सेव्ह पीईएस” च्या लढ्याला यश
छ. संभाजीनगर :-
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंदाजे ₹100 कोटींच्या अपहारासंदर्भात “सेव्ह पीईएस" मूव्हमेंट तर्फे शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले होते.
त्यानुसार, तंत्रशिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी SGGS नांदेड चे संचालक डॉ.एम. बी. कोकरे यांच्या अध्यक्षेतेखाली त्रीसदसीय समिती गठीत करण्यात आली असून, दि. २४ एप्रिल २०२६ पूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संस्थेतील संचालक मंडळातील रंगनाथ व मोरे गटाच्या अंतर्गत वादाच्या पार्श्व भूमीवर मा. उच्च न्यायालयाच्या दि. ०४.०४.२०१३ रोजीच्या आदेशानुसार महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाची तसेच विविध कर अदा करण्याची जबाबदारी संचालकांनी,सह-संचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ही व्यवस्था ऑक्टोबर २०१७ पर्यंत सुरळीतपणे सुरू होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन संचालक डॉ अभय वाघ यांनी कार्यभार घेतल्यानंतर हि व्यवस्था गुपचूप पने, शासनाचे अथवा न्यायालयाचे आदेश नसताना बासनात गुंडाळण्यात आली. तत्कालीन सहसंचालक डॉ. नागदिवे यांना हि बाब देवरे समितीच्या दि. १३ जानेवारी २०२३ च्या अहवालातून कळाली.त्यांनी त्याप्रकरणी कारवाई करण्याऐवजी त्यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान तत्कालीन चेअरमन श्री.रंगनाथ यांनी नियुक्त केलेल्या प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल ब्राम्हणे यांच्या प्रलंबित वेतनाच्या प्रकरणातील प्रक्रिये दरम्यान तंत्रशिक्षण खात्याच्या डिसेम्बर २०२५ च्या पत्रातून हि धक्कादायक बाब पून्हा उघड झाली. शासनाचे किंवा कोर्टाचे आदेश नसताना संबंधित कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर ने २०१७ पासून संचालकांना न्यायालयाने दिलेले अधिकार परस्पर वापरले. त्यामुळे ९ वर्षात अंदाजे १०० कोटी रुपयांचा परस्पर व्यवहार होऊन अपहार झाल्याची शक्यता "सेव्ह पीईएस" ने व्यक्त केली.
भारताच्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेत बेकायदेशीर व्यवहाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या तत्कालीन संचालक डॉ.अभय वाघ, तत्कालीन सहसंचालक श्री.महेश शिवणकर व डॉ. उमेश नागदिवे तसेच विद्यमान अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी "सेव्ह पीईएस" च्या वतीने शासनाकडे करण्यात आली होती. सदर तक्रारीनंतर या गंभीर प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. चौकशी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी “सेव्ह पीईएस” च्या वतीने करण्यात येत आहे.
तसेच, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या आजी व माजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहील असे "सेव्ह पीईएस" तर्फे कळविण्यात येत आहे.
या लढ्यात समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील “सेव्ह पीईएस” तर्फे करण्यात येत आहे.अशी माहिती “सेव्ह पीईएस” मुव्हमेंट चे इंजिनिअर अविनाश कांबळे यांनी दिली.
.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List