गाडीवरून आला, चाकू काढला अन् पेट्रोल पंपावरच प्रेयसीचा गळा चिरला; संभाजीनगर - जालना रोड वरील घटना, पालकांमध्ये खळबळ

गाडीवरून आला, चाकू काढला अन् पेट्रोल पंपावरच प्रेयसीचा गळा चिरला; संभाजीनगर - जालना रोड वरील घटना, पालकांमध्ये खळबळ

करमाड:-  भरदिवसा वर्दळीच्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.News18अविनाश कानडजे, प्रतिनिधीछत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. भरदिवसा वर्दळीच्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेने करमाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा थरार पाहायला मिळाला गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कामावर असलेल्या पूजा सुदाम गावंडे या तरुणीची तिच्याच प्रियकराने गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली. भरवस्तीत आणि लोकांच्या डोळ्यादेखत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुपारी पेट्रोल पंपावर नेमकं काय घडलं? पूजा गावंडे ही तरुणी पेट्रोल पंपावर कर्मचारी म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे ती आपल्या कामात व्यस्त असताना तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे तिथे आला. दोघांमध्ये सुरुवातीला काही वेळ शाब्दिक चकमक झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या सत्यमने अचानक आपल्या खिशातून चाकू काढला आणि काही समजण्याच्या आत पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे पूजाचा जागीच मृत्यू झाला.नेमकं कारण काय? पेट्रोल पंपावर ग्राहकांची वर्दळ असताना ही घटना घडल्याने उपस्थितांची भंबेरी उडाली. पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी सत्यमने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात हा खून प्रेमप्रकरणातील वादातून किंवा संशयातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल पंपावरील एका व्यक्तीने वाचवण्यासाठी प्रयत्न केला मात्र चाकूचा धाक दाखवत आरोपीने त्याला देखील धमकवल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळफरार आरोपी सत्यम गावंडेच्या शोधासाठी करमाड पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हत्या करण्याचे धैर्य गुन्हेगारांमध्ये येतेच कसे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

 

IMG-20240817-WA0005

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 वैशाली श्याम शिरसाठ (माजी प्र- कुलगुरू श्याम सिरसाठ यांच्या पत्नी) यांचे दुःखद निधन वैशाली श्याम शिरसाठ (माजी प्र- कुलगुरू श्याम सिरसाठ यांच्या पत्नी) यांचे दुःखद निधन
छत्रपती संभाजीनगर:- श्रीमती वैशाली श्याम शिरसाठ ( डॉ शाम शिरसाठ प्राध्यापक डॉ. बा. आ. मराठवाडा विद्यापीठ यांच्या पत्नी) वय ४७...
गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या मातोश्री दौलतबी मिन्ने यांचे निधन
पोलिसच बनले पोलिसांचे वैरी!:गुप्तधनाच्या तपासादरम्यान अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल
गाडीवरून आला, चाकू काढला अन् पेट्रोल पंपावरच प्रेयसीचा गळा चिरला; संभाजीनगर - जालना रोड वरील घटना, पालकांमध्ये खळबळ
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे शोषणाविरुद्धचे मानवी मूल्य : प्रा. डॉ. उमेश बगाडे यांचे प्रतिपादन 'शिवराय का आठवावे?' : प्रा. डॉ. उमेश बगाडे यांनी उलगडले शिवरायांच्या स्वराज्याचे समाजशास्त्रीय पदर
मिनाक्षी पवार यांची जि.प. महिला बालकल्याण सभापती पदी निवड, कन्नड तालुक्यात आनंदाचे वातावरण; अनेकांनी केले अभिनंदन
मटणावरून वाद, रिसॉर्ट कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ जखमी, एकाची प्रकृती गंभीर
Join Us on Whatsapp