मिनाक्षी पवार यांची जि.प. महिला बालकल्याण सभापती पदी निवड, कन्नड तालुक्यात आनंदाचे वातावरण; अनेकांनी केले अभिनंदन

मिनाक्षी पवार यांची जि.प. महिला बालकल्याण सभापती पदी निवड, कन्नड तालुक्यात आनंदाचे वातावरण; अनेकांनी केले अभिनंदन

कन्नड (अरुण थोरात):  चापानेर जिल्हापरिषद गटा च्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी किशोर पवार यांची जिल्हा परिषद संभाजीनगर च्या महिला बालकल्याण सभापती पदी निवड झाल्याने कार्यकर्ते, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

कन्नड तालुक्यातील चापानेर जिल्हा परिषद गटावर स्व.नारायणराव पवार यांच्या परिवाराचे गेली चार पाच पंचवार्षिक पासून वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत ही मा.जि.प.सदस्य किशोर आबा पवार यांच्या पत्नी तथा मा.मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कन्या मिनाक्षी पवार यांनी भाजप च्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवित सत्ता काबिज केली. 

भाजप ने जिल्हा परिषदे वरती सत्ता मिळवित अध्यक्ष व उपाध्यक्ष मिळवित, मित्र पक्ष शिवसेनेला धक्का दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेत तालुक्याला कोणते सभापती पद मिळते याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. दि.02 एप्रिल रोजी झालेल्या विविध सभापती पदांच्या निवडीत महिला बालकल्याण सभापती पदाची माळ मिनाक्षी पवार यांच्या गळ्यात पडल्याने कार्यकर्ते, ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

या निवडी बद्दल भाजप संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, राज्य कार्यकारणी सदस्य तथा जिल्हापरिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, जिल्हापरिषद सदस्या मंजुषा मलदुडे, भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे, भाजप पश्चिम मंडलाध्यक्ष ललित सुरासे, मा.पंचायत समिती उपसभापती सुनिल निकम, अरुण थोरात, भावेश शिंदे, सुदाम पवार, दिनकर दाभाडे, रतन मधे, आदींनी अभिनंदन केले आहे.

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 वैशाली श्याम शिरसाठ (माजी प्र- कुलगुरू श्याम सिरसाठ यांच्या पत्नी) यांचे दुःखद निधन वैशाली श्याम शिरसाठ (माजी प्र- कुलगुरू श्याम सिरसाठ यांच्या पत्नी) यांचे दुःखद निधन
छत्रपती संभाजीनगर:- श्रीमती वैशाली श्याम शिरसाठ ( डॉ शाम शिरसाठ प्राध्यापक डॉ. बा. आ. मराठवाडा विद्यापीठ यांच्या पत्नी) वय ४७...
गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या मातोश्री दौलतबी मिन्ने यांचे निधन
पोलिसच बनले पोलिसांचे वैरी!:गुप्तधनाच्या तपासादरम्यान अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल
गाडीवरून आला, चाकू काढला अन् पेट्रोल पंपावरच प्रेयसीचा गळा चिरला; संभाजीनगर - जालना रोड वरील घटना, पालकांमध्ये खळबळ
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे शोषणाविरुद्धचे मानवी मूल्य : प्रा. डॉ. उमेश बगाडे यांचे प्रतिपादन 'शिवराय का आठवावे?' : प्रा. डॉ. उमेश बगाडे यांनी उलगडले शिवरायांच्या स्वराज्याचे समाजशास्त्रीय पदर
मिनाक्षी पवार यांची जि.प. महिला बालकल्याण सभापती पदी निवड, कन्नड तालुक्यात आनंदाचे वातावरण; अनेकांनी केले अभिनंदन
मटणावरून वाद, रिसॉर्ट कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ जखमी, एकाची प्रकृती गंभीर
Join Us on Whatsapp