पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा ; वाचा कोणत्या तारखेला कोठे होणार निवडणूक
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार दि. १५ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केली. आसाम, केरळम, पुदुच्चेरी येथे ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर पश्िचम बंगाल विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार असून येथे २३ एप्रिल आणि २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. पाचही राज्यांमधील मतमोजणी ४ मे २०२६ रोजी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की आसाम, केरळम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये एकूण १७.४ कोटी मतदार आणि ८२४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे २.१९ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून साधारण २५ लाख कर्मचारी निवडणूक कामात तैनात केले जातील. साम विधानसभेची मुदत २० मे, केरळची २३ मे, पुद्दुचेरीची १५ जून, तामिळनाडूची १० मे आणि पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत ७ मे रोजी संपत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांच्या संख्येचा आढावा देताना सांगितले की, अंतिम यादीनुसार आसाममध्ये सुमारे २.२५ कोटी, केरळममध्ये २.७ कोटी, पुद्दुचेरीमध्ये ९.४४ लाख आणि तामिळनाडूमध्ये ५.६७ कोटी मतदार आहेत; तसेच २८ फेब्रुवारीच्या अंतिम यादीनुसार पश्चिम बंगालमध्ये ६.४४ कोटी मतदार असून, माननीय न्यायाधीशांच्या निर्णयानुसार जी काही अतिरिक्त (पुरवणी) यादी येईल, ती यामध्ये नंतर समाविष्ट केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक भारताच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सवआयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, या निवडणुका म्हणजे केवळ लोकशाहीची प्रक्रिया नसून, भारताच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव आहे. तो आपल्या देशातील विविधतेतील एकता ख-या अर्थाने अधोरेखित करतात. आसाम, केरळम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये १०० वर्षांहून अधिक वयाचे (शतायुषी) आणि ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या लक्षणीय आहे. निवडणुकीसाठी एकूण २.१८ लाख मतदान केंद्रे उभारली जातील. प्रत्येक केंद्रावर सरासरी ७५० ते ८५० मतदार असतील. सर्व राज्यांत आदर्श मतदान केंद्रे उभारली जातील. काही केंद्रे पूर्णपणे महिलांद्वारे, तर काही दिव्यांग बांधवांद्वारे चालवली जातील; तसेच सर्व मतदान केंद्रांवर १००% वेबकास्टिंग (थेट प्रक्षेपण) करण्याची सोय असेल असेही ज्ञानेश कुमार यांनी सांगितले
.
आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे
.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List