पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा ; वाचा कोणत्या तारखेला कोठे होणार निवडणूक

 पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा ; वाचा कोणत्या तारखेला कोठे होणार निवडणूक

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार दि. १५ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केली. आसाम, केरळम, पुदुच्चेरी येथे ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. तामिळनाडूमध्­ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर पश्­िचम बंगाल विधानसभा निवडणूक दोन टप्­प्­यांमध्­ये होणार असून येथे २३ एप्रिल आणि २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. पाचही राज्­यांमधील मतमोजणी ४ मे २०२६ रोजी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की आसाम, केरळम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये एकूण १७.४ कोटी मतदार आणि ८२४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे २.१९ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून साधारण २५ लाख कर्मचारी निवडणूक कामात तैनात केले जातील. साम विधानसभेची मुदत २० मे, केरळची २३ मे, पुद्दुचेरीची १५ जून, तामिळनाडूची १० मे आणि पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत ७ मे रोजी संपत असल्­याचेही त्­यांनी स्­पष्­ट केले.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांच्या संख्येचा आढावा देताना सांगितले की, अंतिम यादीनुसार आसाममध्ये सुमारे २.२५ कोटी, केरळममध्ये २.७ कोटी, पुद्दुचेरीमध्ये ९.४४ लाख आणि तामिळनाडूमध्ये ५.६७ कोटी मतदार आहेत; तसेच २८ फेब्रुवारीच्या अंतिम यादीनुसार पश्चिम बंगालमध्ये ६.४४ कोटी मतदार असून, माननीय न्यायाधीशांच्या निर्णयानुसार जी काही अतिरिक्त (पुरवणी) यादी येईल, ती यामध्ये नंतर समाविष्ट केली जाईल असेही त्­यांनी स्­पष्­ट केले.

निवडणूक भारताच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सवआयुक्त ज्ञानेश कुमार म्­हणाले की, या निवडणुका म्हणजे केवळ लोकशाहीची प्रक्रिया नसून, भारताच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव आहे. तो आपल्या देशातील विविधतेतील एकता ख-या अर्थाने अधोरेखित करतात. आसाम, केरळम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये १०० वर्षांहून अधिक वयाचे (शतायुषी) आणि ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या लक्षणीय आहे. निवडणुकीसाठी एकूण २.१८ लाख मतदान केंद्रे उभारली जातील. प्रत्येक केंद्रावर सरासरी ७५० ते ८५० मतदार असतील. सर्व राज्यांत आदर्श मतदान केंद्रे उभारली जातील. काही केंद्रे पूर्णपणे महिलांद्वारे, तर काही दिव्यांग बांधवांद्वारे चालवली जातील; तसेच सर्व मतदान केंद्रांवर १००% वेबकास्टिंग (थेट प्रक्षेपण) करण्याची सोय असेल असेही ज्ञानेश कुमार यांनी सांगितले

.IMG-20251117-WA0399

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा ; वाचा कोणत्या तारखेला कोठे होणार निवडणूक पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा ; वाचा कोणत्या तारखेला कोठे होणार निवडणूक
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार दि. १५...
जागतिक महिला दिना निमित्त रंगला..  " ती" च्या अवकाशात विशेष काव्य सोहळा'.
पत्रकार भवनात दावत-ए-इफ्तार : जिंतूरमध्ये सामाजिक सलोख्याचे वातावरण 
कन्नड मध्ये महिलाराज.. सभापतीपदी सेनेच्या सुरेखा घुगे तर उपसभापतीपदी भाजपच्या माया सुरासे
सध्याच्या काळातील गुरु (प्राध्यापक) आणि विद्यार्थी : बदलते वास्तव
श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी येथे ६ आणि ७ मार्च रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
Join Us on Whatsapp