कन्नड मध्ये महिलाराज.. सभापतीपदी सेनेच्या सुरेखा घुगे तर उपसभापतीपदी भाजपच्या माया सुरासे
महिलाराज.. सभापतीपदी सेनेच्या सुरेखा घुगे उपसभापतीपदी भाजपच्या माया सुरासे
कन्नड(अरुण थोरात):
कन्नड पंचायत समिती निवडणूकीत एकमेकां विरुध्द लढलेल्या शिवसेना-भाजप चे सभापती निवडीत मात्र सूत जुळून, सभापती पदी शिवसेनेच्या सुप्रिया अनिलकुमार घुगे यांची तर उपसभापती पदी भाजपच्या माया सुराशे यांची निवड झाली आहे. त्यामुळे कन्नड पंचायत समितीत महिलाराज आले आहे.
जि.प.पं.स. निवडणुकीत शिवसेना भाजप आमने सामने लढले, त्यात 08 जागा जिंकून पंचायत समितीत शिवसेना बहुमताच्या उंबरठ्यावर पोहचली मात्र बहुमतासाठी केवळ एक आकडा कमी पडला. भाजप ने चार जागा जिंकत दुसरा क्रमांक मिळविला. कांग्रेस न एक जागा जिंकली मात्र कांग्रेस च्या कविता राठोड यांनी नंतर भाजप मध्ये प्रवेश केला. त्यामुळे अप्रत्यक्षरिता भाजप ची सदस्य संख्या पाच झाली. तर कांग्रेस ची सदस्य संख्या शुन्य झाली. राष्ट्रवादी पक्षाने 01, रायभान जाधव विकास आघाडी 01 जागा जिंकली. त्यामुळे स्पष्ट बहुमत कोणाला ही मिळविता आले नसले तरी, शिवसेना सत्तेच्या उंबरठ्यावर असल्याने, शिवसेना सभापती पद मिळवेल अशी दाट शक्यता असतानाच भाजप ने ही इतरांच्या मदतीने सभापती पदा साठी रणनिती आखली. उमेदवारांची पळवापळवी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपले नवनिर्वाचित सदस्य सुरक्षित ठिकाणी हलविले,
अखेर दोन्ही पक्षांनी जुळवून घेत दि.10 मार्च रोजी सभापती पदासाठी झालेल्या बैठकीत, सभापती पदाची माळ शिवसेनेच्या निंभोरा गणांतून विजयी झालेल्या सुप्रिया अनिलकुमार घुगे यांच्या गळ्यात, तर उपसभापती पदी देवगाव रंगारी गणातून विजयी झालेल्या व भाजप तालुकाध्यक्ष ललित सुरासे यांच्या पत्नी माया ललित सुरासे यांच्या गळ्यात टाकण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांसह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List