अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री; चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी:मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी

अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री; चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी:मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मागणी मान्य अद्याप मान्य करण्यात आली नाही. छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे होते. त्यांना अजूनही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकचे पालकमंत्री पद विद्यमान शिवसेनेचे दादा भुसे आहेत. या जागेवर भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचा दावा आहे. मात्र, दोघांच्या या दाव्यामध्ये भुजबळ आणि महाजन यांचा दावा पेंडिंग ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद

नाशिक, रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे या बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या बाबतीत अद्याप तोडगा निघालेला नसल्याचे यावरुन दिसून येत आहे. या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्रिमंडळ विस्तारानंतर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाजपचे चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचं तिढा सुटत नव्हता. स्वातंत्र्य दिनी देखील अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केले होते. तर पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार, असा पेच होता. आज अखेर हा पेच सुटला असून पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार असतील, तर भाजपचे चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असणार आहे.

सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

1.                   पुणे - अजित पवार

2.                  अकोला - राधाकृष्ण विखे- पाटील

3.                  सोलापूर - चंद्रकांत दादा पाटील

4.                  अमरावती - चंद्रकांत दादा पाटील

5.                  वर्धा - सुधीर मुनगंटीवार

6.                  भंडारा - विजयकुमार गावित

7.                  बुलढाणा - दिलीप वळसे-पाटील

8.                  कोल्हापूर - हसन मुश्रीफ

9.                  गोंदिया - धर्मरावबाबा आत्राम

10.              बीड - धनंजय मुंडे

11.              परभणी - संजय बनसोडे

12.    नंदूरबार - अनिल भा. पाटील

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

 

IMG-20230903-WA0117

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp