जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....

जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....

 

ढोरेगाव:- ( राजेश हिवाळे )

   जिल्हा परिषद शाळेत/समाजात वाचन संस्कृती अधिकाधिक रुजावी,पुस्तक वाचनाच्या परंपरा निर्माण व्हाव्यात.या भावनेतून वाचन संस्कृतीचे कार्य करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला अवांतर वाचनाची पुस्तके भेट दिली.विशेष म्हणजे पुस्तकांची ही भेट देऊन पुस्तक व वाचन संस्कृतीला प्राधान्य द्यावे हा संदेश त्यांनी जाणीवपूर्वक या कृतीतून दिला.

   समाज ज्ञानवान झाला पाहिजे.बुद्धिजीवी घडले पाहिजे.त्यासाठी वाचन गरजेचे आहे.गावाच्या विकासाचा मार्ग शाळेतून जातो.शिक्षणाचा मार्ग वाचनातून जातो.त्यासाठी विद्यार्थ्यांनी खुप पुस्तके वाचावीत.त्यांना वाचनासाठी विविध पुस्तके उपलब्ध व्हावीत या प्रगल्भ हेतूने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली .

    छत्रपती संभाजीनगरच्या जमाते इस्लामी हिंदचे अध्यक्ष सलमान सिद्धिकी,वाजेद कादरी,वसीमोद्दिन नेहरी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान पुस्तकांची भेट देत शिक्षण-सेवेचा प्रशंसनीय आदर्श ठेवला आहे.या पुस्तकांमध्ये महत्त्वपूर्ण साहित्याचा समावेश असून विद्यार्थ्यांच्या वाचनसंपदेचे दालन अधिक समृद्ध झाले आहे.शाळा परिवाराने हा उपक्रम मनापासून कौतुकाने स्वीकारला असून “ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेला उजाळा देणारा हा स्तुत्य प्रयत्न सर्वांच्या हृदयाला भिडणारा आहे.ज्ञानदानाची प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर मिश्रण असलेल्या या उपक्रमाचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.

    या उपक्रमाअंतर्गत विविध पुस्तके शाळेला हस्तांतरित करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचनसामुग्रीची उपलब्धता व्हावी, वाचनाची आवड वाढावी आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी, या हेतूने हा पुस्तकदान उपक्रम राबवण्यात आला.

     शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि पालकांनी या समाजहितैषी कृतीचे मन:पूर्वक स्वागत केले. त्यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील शाळांना वाचनालयासाठी संसाधनांची तुटवडा भासतो. अशा प्रकारच्या पुस्तकदान उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील ज्ञानलालसा वाढीस लागेल.” विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त करत या पुस्तकांचा मनापासून अभ्यास करण्याचे आश्वासन दिले.हा उपक्रम सामाजिक एकात्मता, बांधिलकी आणि शिक्षणाप्रती असलेली नितांत जाणीव अधोरेखित करणारा आहे.या दानाने केवळ पुस्तकांचे वजन वाढले नाही, तर ढोरेगावच्या मुलांच्या स्वप्नांना नवे पंख लाभले अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

    “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी दिलीप स्वामी यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘बुक बँक’ उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अभियानाला अधिक बळकटी प्राप्त होऊन ज्ञानवाटपाची चळवळ अधिक सक्षमपणे पुढे जात आहे.

       जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण,गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे,केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर,सरपंच रजियाबी अयुब पटेल,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल यांनी दानशुरांचे आणि ढोरेगाव शाळेस लाभत असलेल्या लोकसहभागाबद्दल शिक्षकांच्या स्तुत्य प्रयत्नांसाठी कौतुक केले आहे.

    केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे,पदवीधर शिक्षक राजेश हिवाळे,मनोज घुले,शंकर राऊत,बसवराज उदे,दिलीप धर्माधिकारी,भाऊसाहेब गाढवे,मनोज मस्के,नीलिमा कुलकर्णी,मुग्धा निमसे,परमेश्वर मस्के,सचिन पाटसकर,शामीर शेख,अली बाकोदा,कल्याणी जगताप यांच्यासह विद्यार्थ्यांनी दात्यांचे आभार मानले आहेत.

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

IMG-20240814-WA0257

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.11 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार :  राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
    छत्रपती संभाजीनगर : देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या उघड व छुप्या
जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
मराठवाडा मूर्तीने समृद्ध परिपूर्ण असणारा भूप्रदेश -डॉ. माया पाटील 
प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान
संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 
जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....
विवेकानंद शिक्षण संस्था संचलित मराठा हायस्कूल, चौराहा येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी
Join Us on Whatsapp