विद्यार्थ्यांच्या यशासाठी बासरीच्या सुरावटीसह शुभेच्छांचा सुवास : ढोरेगाव येथे शिष्यवृत्ती परीक्षार्थींचे चॉकलेटसह गुलाबपुष्पाने उत्साहपूर्ण स्वागत.
ढोरेगाव (राजेश हिवाळे) :-
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव येथे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे बासरीच्या सुरावटीत शाळेच्या प्रवेशद्वारावर केंद्र संचालक दत्तात्रय दाणेकर,अंजली पु-हे,राजेश हिवाळे,मनोज घुले,विजय इंगळे व पर्यवेक्षक शिक्षकवृंदांनी परीक्षार्थींचे गोड चॉकलेटसह गुलाबपुष्पाने स्वागत करत त्यांना यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत सन्मान केला.या अकल्पित स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी बासरीच्या सुरावटीसह शुभेच्छांचा सुवासात नव्या उत्साहाने परीक्षेला ते सामोरे गेले.
शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते.परीक्षेच्या तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मकता व प्रेरणा मिळावी या हेतूने विद्यार्थ्यांवरील तणाव कमी व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे शाळेच्या सकारात्मक आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोनाची प्रचिती पुन्हा एकदा आली. ग्रामस्थ व उपस्थित पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
केंद्र संचालक दत्तात्रय दाणेकर,अंजली पु-हे,राजेश हिवाळे,मनोज घुले,विजय इंगळे यांच्या नियोजनात शंकर राऊत,बसवराज उदे,मनेश दारकुंडे,प्रमोद खलाणे,दयानंद भुतके,अशोक इंगळे,शेखर फुलारी,रावसाहेब चोंधे,अशोक सोनवणे,मुग्धा निमसे,नीलिमा कुलकर्णी,योगिता ओझरे,रत्ना पाटील,संजीवनी सोन्नी,संगीता शिंदे,नीता शंकरपेल्ली,ऐश्वर्या तुपे,,दैवशाला कावळे,हर्षा खरात यांच्या पर्यवेक्षणात परीक्षेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना देऊन शांत व अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यात आले.परीक्षागृहांची स्वच्छता, आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच आवश्यक सूचनांचे मार्गदर्शन याची काळजी घेण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शांततेत आणि आत्मविश्वासाने प्रश्नपत्रिका सोडविण्यास प्रोत्साहित केले.
शाळेच्या या स्वागत उपक्रमामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला असून त्यांच्या यशासाठी संपूर्ण गावकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थीकेंद्री दृष्टीकोनाची प्रशंसा केली.अशा सकारात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबाबत भीती न राहता आत्मविश्वास निर्माण होतो, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List