कोचिंग क्लासवाल्या शिक्षकाने फोडले 12 वी चे पेपर , एका विद्यार्थिनीचे मोबाईल जप्त करून चौकशी सुरू ; या प्रकरणाने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ

कोचिंग क्लासवाल्या शिक्षकाने फोडले 12 वी चे पेपर , एका विद्यार्थिनीचे मोबाईल जप्त करून चौकशी सुरू ; या प्रकरणाने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ

नागपूर : बारावी परीक्षेचे दोन पेपर फुटले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे, याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विद्यार्थिनीचा स्मार्टफोन जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे? याचा पोलिस कसून तपास करीत आहेत. एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे.सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर आल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर होता मात्र परीक्षेआधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आला होता.
सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात होती त्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षकाला तिचा संशय आला. त्यांनी तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झाडाझडती घेतली. तिच्याकडील एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता, असे पोलिसांनी सांगितले. केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे.
खासगी शिकवणी वर्गाचे कनेक्शनजप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये १५ विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळले. या ग्रुपमधील दोन विद्यार्थिनींची चौकशी पोलिस करीत आहेत. एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रुपमधील अन्य १३ विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देत होते. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, हे लवकरच समजेल.

IMG-20240814-WA0257

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.11 PM

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

IMG-20251117-WA0399

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp