समायोजन वेळापत्रकाची  मराठवाडा शिक्षक संघाने केली होळी 

समायोजन वेळापत्रकाची  मराठवाडा शिक्षक संघाने केली होळी 



छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : मराठवाडा शिक्षक संघाने शासनाच्या संचमान्यता निकष व समायोजन वेळापत्रकाविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश एस एस सी व एच एस सी बोर्ड परीक्षेच्या काळात नियोजित समायोजन प्रक्रिया तारखा बदलण्यात याव्यात आणि १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयातील ९वी व १०वी च्या किमान संख्येच्या अटींमुळे राज्यातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात फुगलेली आहे, त्यात संशोधन करून सुधारित निकष तयार करण्यात आले पाहिजे हा आहे. तसेच एच एस एस सी बोर्ड परीक्षेत मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शिक्षकांवर सरसकट गुन्हे दाखल होत आहेत त्याची संपूर्ण चौकशी शिवाय सरसकट गुन्हे दाखल करू नयेत ही बाब अन्यायकारक व कायदेशीर नाही याची दखल घेत निर्दोष शिक्षकांवर होत असलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी विभागीय उपसंचालक कार्यालय, भडकल गेट, छत्रपती संभाजीनगर येथे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्रीय कार्यकारिणीचे सहसचिव राजकुमार कदम, केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे महानगर सचिव नवनाथ मंत्री, अशोक ढमढेरे, रावसाहेब बोरसे, विनोद केनेकर, विलास चव्हाण, कृष्णा गोंडे, रवींद्र मगर, रामेश्वर गोराडे, संभाजी जाधव, सचिन मुसळे, सागर सुर्यवंशी, तुकाराम भवर, धनंजय भवर, अजित जाधव, विवेक पाटील, जितेंद्र शिंदे, पद्माकर पगार, संतोष सुरडकर, अरूणा चौधरी, सविता हिंगे, सोनाली गव्हाणे, स्वाती बोंडे, रेखा साकळे यांच्यासह अनेक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होत.

समायोजनाची नियोजन प्रक्रिया १३ फेब्रुवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येऊ नये या कालावधीत इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा सुरू आहे. सर्व शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी परीक्षेच्या कामात व्यस्त आहेत, म्हणून आपण ही समायोजन प्रक्रिया परीक्षा संपल्यानंतरच घ्यावी. तसेच १०वी व १२वी परीक्षेत शिक्षकांवर सरसकट गुन्हे दाखल होत आहेत त्याची संपूर्ण चौकशी शिवाय सरसकट गुन्हे दाखल करणे अन्यायकारक व कायदेशीर नाही याची दखल घेत हा निर्दोष शिक्षकांवरील होत असलेला अन्याय तत्काळ थांबवावा अन्यथा मराठवाडा शिक्षक संघाने शासनाला ठणकावून इशाराच दिलेला आहे की येणाऱ्या काळात संपूर्ण मराठवाड्यात उग्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात येतील.

IMG-20260218-WA0699

IMG-20260218-WA0700

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

IMG-20251117-WA0399

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

 

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp