अपयशाने निराश न होता मिळालेल्या संधीचे सोने करा - डॉ. नंदकुमार राठी ; मुक्त विद्यापीठाच्या रोजगार मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद 352 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या, 105 जणाना जागेवर नियुक्ती पत्र
छत्रपती संभाजीनगर :
अपयश म्हणजे शेवट नाही तर अनुभवाची शिदोरी समजून झालेल्या चुकांची दुरुस्ती करुन यशाकडे झेपावण्याचा मार्ग आहे. म्हणून युवकांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करावे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय केंद्राचे संचालक डॉ. नंदकुमार राठी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे छत्रपती संभाजीनगर विभागीय केंद्र, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय आणि युवाशक्ती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. राठी बोलत होते. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन स. भु. महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष दिपकजी पांडे, यांनी केले. या प्रसंगी युवाशक्ती फाऊंडेशनचे डॉ. दिपक पवार, नांदेड विभागीय केंद्राचे संचालक डॉ. यशवंत कलेपवार, मुक्त विद्यापीठाच्या ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे संचालक प्रा. कैलास मोरे, स. भु. शिक्षण संस्थेचे सदस्य डॉ. जगदीश खैरनार, प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे, प्राचार्य डॉ. हसन इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. नंदकुमार राठी म्हणाले की, मुक्त विद्यापीठाचे शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता रोजगार क्षमतेकडे नेणारे असावे हा आमचा मुख्य उद्देश आहे. उद्योगजगताच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्यांचा विकास करणे आणि त्यांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांचे कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यवसाईक दृष्टीकोन विकसीत करण्याच्या दृष्टीने असे रोजगाराभिमुख उपक्रमे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमुद केले. युवाशक्ती फाऊंडेशनच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना जागतीक स्तरावरील कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
या रोजगार मेळाव्यास 352 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या त्यातील 105 लोकांना लगेचच नियुक्ती पत्र देण्यात आले.
या प्रसंगी स. भु. महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या वतीने विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा रोजगरर व कौशल्यविकास केंद्रित उपक्रमाचे आयोजन करण्याची ग्वाही दिली. या रोजगार मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्या करिअरला निश्चित दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. तृप्ती रेंगे यांनी केले.

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे
.jpeg)

Tags:
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Related Posts
Post Comment
Latest News
03 Sep 2026 01:35:43
कळंब, : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.


Comment List