शरद पवार यांची तब्बेत अचानक बिघडली पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल
बारामती :
खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार सध्या बारामतीत आहेत. बारामतीतून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचे सांगितले जात नव्हते. आज मात्र त्यांना जास्त त्रास झालेला आहे. त्यांना ताप, खोकला आणि कफ असल्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवार यांच्या कार्यालयाने तशी माहिती दिली आहे. आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडतो आहे. या विधीला शरद पवार तसेच त्यांचे इतर कुटुंबीय उपस्थित राहणार होते. परंतु आज सकाळपासूनच शरद पवार यांना त्रास होत होता.
शरद पवार यांना सकाळपासूनच खोकला, ताप, सर्दीचा त्रास जाणवत असल्याने सकाळीच डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाली होती. डॉक्टरांनी शरद पवार यांची नियमित तपासणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दुपारी डॉक्टरंची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेले होते.
शरद पवार यांना आता पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही मिनिटांपूर्वीच शरद पवार हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत शरद पवार यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळेदेखील आहेत. शरद पवार यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिकादेखील आहे. थोड्याच वेळात शरद पवार पुण्यात दाखल होतील. त्यानंतर शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार केले जातील.

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे
.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List