उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना झेड प्लस सुरक्षा ; १० कमांडो, ५५ सुरक्षा कर्मचारी आणि.......

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना झेड प्लस सुरक्षा ; १० कमांडो, ५५ सुरक्षा कर्मचारी आणि.......

मुंबई : प्रतिनिधीगृह विभागाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची वाय प्लस सुरक्षा व्यवस्था हटवून त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या जबाबदा-या त्यांच्याकडे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारीला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थ खाते वगळता इतर तीन खात्यांची जबाबदारी देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली.

उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर अजित पवारांकडे असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देखील सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. आता फडणवीस यांच्या गृह विभागाकडून सुनेत्रा पवार यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.झेड प्लस सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींना पुरवली जाते. या सुरक्षा व्यवस्थेत १० कमांडोंची तुकडी, ५५ सुरक्षा कर्मचारी तसेच बुलेटप्रूफ वाहन पुरवले जाते. तसेच ही सुरक्षा व्यवस्था २४ तास संबंधित व्यक्तीसोबत असते.

उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणारसुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, त्यांनी पदाचा कार्यभार अजून स्वीकारलेला नाही. अजित पवारांच्या निधनामुळे त्या सध्या बारामतीमध्ये आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सातारचा दौरा करत क-हाडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले

.WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार :  राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
    छत्रपती संभाजीनगर : देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या उघड व छुप्या
जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
मराठवाडा मूर्तीने समृद्ध परिपूर्ण असणारा भूप्रदेश -डॉ. माया पाटील 
प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान
संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 
जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....
विवेकानंद शिक्षण संस्था संचलित मराठा हायस्कूल, चौराहा येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी
Join Us on Whatsapp