अपघाताआधी अजितदादांशी मी दोन तास बोललो, मी अनेक गोष्टी सांगेल पण…; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने खळबळ तर शशिकांत शिंदे यांनी अजित दादांची शपथ घेऊन सांगितले........

अपघाताआधी अजितदादांशी मी दोन तास बोललो, मी अनेक गोष्टी सांगेल पण…; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने खळबळ तर शशिकांत शिंदे यांनी अजित दादांची शपथ घेऊन सांगितले........

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अजित पवार हे भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय करतील का? असा प्रश्न विचारला आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तारीख ठरली असती तर आम्हाला सांगितले असते, असेही ते म्हणाले.

तसेच राष्ट्रवादीने विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही होते, आणि 12 फेब्रुवारीला ते जाहीर करणार होते, असा दावा शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समजा अजित पवार जर राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचा निर्णय घेत असतील तर ते भाजपशी चर्चा केल्याशिवाय घेतील का? चर्चा अंतिम स्टेजला गेली असती, तारीख ठरली असती तर त्यांनी आम्हाला सांगितले असते. अशा प्रकारच्या कोणत्याही तारखेची आम्हाला माहिती नाही.

राष्ट्रवादीने असा कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी. अजित पवार अशी चर्चा करीत असतील तर ते सरकार मधून बाहेर पडण्यासाठी करत होते का? मी अनेक गोष्टी सांगू शकतो, पण मला यावर बोलायचे नाही. अजित पवार आणि मी दोन तास बोलत बसलो होतो, तशी कोणतीही माहिती मला त्यांनी दिली नाही.

अजित पवार यांच्या पक्षाने निर्णय घेतला, सुनेत्रा ताईंनी नेतृत्व करावे त्यांचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयासोबत उभे राहणे हे आमचं काम आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. देवेंद्र फडणीसांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देत ते म्हणाले की, अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती, 12 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता.

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रा. विश्वास गव्हाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. विश्वास गव्हाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
पैठण :-( प्रतिनिधी ) बी. द.चेंज फाउंडेशन तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्रा. विश्वास सयाजीराव गव्हाणे...
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वर्तनात आणला पाहिजे :  प्रविण डाळींबकर
निधन वार्ता : लक्ष्मीबाई सौंगडे यांचे निधन
अपघाताआधी अजितदादांशी मी दोन तास बोललो, मी अनेक गोष्टी सांगेल पण…; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने खळबळ तर शशिकांत शिंदे यांनी अजित दादांची शपथ घेऊन सांगितले........
बजेटमुळे काय स्वस्त ? काय महाग ? प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे, नवीन जलमार्ग, मेडिकल हब, गाईड ट्रेनिंग सेंटर आणि बरेच काही; संपूर्ण बजेट समजून घ्या या एकाच बातमी मधून
मोठी बातमी, मालेगाव पालिकेत भाजप आणि काँग्रेस आले एकत्र, गट सुद्धा केला स्थापन.......
महापौर निवडणुकीत तुफान राडा, काँग्रेस विरुद्ध MIM चे नगरसेवक भिडले, बांगड्या फेकून मारल्या
Join Us on Whatsapp