ना परीक्षा, ना मुलाखत, थेट नोकरीची संधी; इंडियन ऑईलमध्ये मेगाभरती, कसा कराल अर्ज?

ना परीक्षा, ना मुलाखत, थेट नोकरीची संधी; इंडियन ऑईलमध्ये मेगाभरती, कसा कराल अर्ज?

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आल्या आहेत.Indian Oil Recruitment: ना परीक्षा, ना मुलाखत, थेट नोकरीची संधी; इंडियन ऑईलमध्ये मेगाभरती, कसा कराल अर्ज?सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कंपनीमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आल्या आहेत. जे ग्रॅज्युएशन पास आणि बारावी पास असतील त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइलच्या पाईपलाइन विभागात शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentice) एकूण 394 जागा भरल्या जाणार आहेत. तरूणांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणांच्या (Merit Basis) आधारेच त्यांची निवड केली जाणार आहे.अप्रेंटिसशिपच्या भरतीला 28 जानेवारीपासून सुरूवात होणार असून शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2026 आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी तुम्ही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरू शकणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार NAPS आणि NATS पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. संपूर्ण देशामध्ये भरती प्रक्रिया पार पडली जाणार असून इंडियन ऑइलच्या पाईपलाइन विभागात असलेली 394 रिक्त जागांसाठी ही भरती देशातील प्रत्येक राज्यांतर्गत वेगवेगळी भरती केली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, मनमाड आणि सोलापूर या तीन ठिकाणी एकूण 12 शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार जाईल. या भरती प्रक्रियेत तांत्रिक आणि बिगर तांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे.advertisementविविध पदे आणि शैक्षणिक पात्रता टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम आणि इन्स्ट्रुमेंटेशन): संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील ३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा.ट्रेड अप्रेंटिस (Assistant HR): कोणत्याही विषयातील पूर्णवेळ पदवी (Graduation).ट्रेड अप्रेंटिस (Accountant): वाणिज्य शाखेतील (B.Com) पदवी.डेटा एन्ट्री ऑपरेटर (Fresher/ Skill Certificate): किमान 12वी उत्तीर्ण, परंतु पदवीधर नसावा.वरती नमुद केलेली सर्व शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.advertisementअर्जदारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराचे वय 31 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार, SC/ ST उमेदवारांना 5 वर्षे आणि तर OBC (NCL) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. उमेदवार NAPS आणि NATS या पोर्टलद्वारे वेगवेगळ्या ट्रेडसाठी अर्ज करू शकणार आहेत. जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी प्रथम ट्रेडनुसार NATS (https://nats.education.gov.in/) किंवा NAPS (https://www.apprenticeshipindia.gov.in) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर इंडियन ऑइलच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा. https://plapps.indianoilpipelines.in/ ही अधिकृत वेबसाइट आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान नियमानुसार मासिक पगार म्हणजेच स्टायपेंड देखील दिले जाणार आहे.

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp