२७ जानेवारी मंगळवारी देशभर बँकिंग सेवा ठप्प, बँक कर्मचाऱ्यांची संपाची घोषणा; चौथ्या दिवशी बँका बंद, पूर्ण शटडाऊन
या संपामुळे सरकारी बँकांमधील रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स, शाखांमधील दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार आहे. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात आधीच चौथा शनिवार (23 जानेवारी), रविवार (25 जानेवारी) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) या सुट्ट्यांमुळे बँका बंद होत्या. त्यामुळे हा सलग चौथा दिवस असेल, जेव्हा सरकारी बँकांचे कामकाज प्रभावित होणार आहे. मात्र, खासगी बँकांवर या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही, कारण त्या UFBU चा भाग नाहीत.
बँक कर्मचारी संपावर का जात आहेत?
बँक कर्मचारी आणि सरकार यांच्यातील वादाचे मुख्य कारण म्हणजे शनिवारची सुट्टी. बँक कर्मचारी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून ‘5-डे वर्क वीक’ लागू करण्याची मागणी करत आहेत. मार्च 2024 मध्ये इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक युनियन्स यांच्यात झालेल्या 12व्या द्विपक्षीय करारात सर्व शनिवार सुट्टी देण्यावर सहमती झाली होती मात्र या करारानंतरही सरकारकडून अद्याप अधिकृत अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी करण्यात आलेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. युनियन्सचे म्हणणे आहे की, ही मागणी कोणतीही अतिरेकी नसून संतुलित कामकाजासाठी आहे. त्यासाठी कर्मचारी दररोज 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यासही तयार आहेत.सध्या बँका महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार एवढ्याच दिवशी बंद असतात. आता सर्व शनिवार सुट्टी जाहीर करणारी अधिसूचना सरकारने तात्काळ काढावी, अशी ठाम मागणी युनियन्स करत आहेत. या संपाचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल?शाखांमधील कामकाज ठप्प:जर तुम्हाला बँकेत जाऊन रोख रक्कम जमा करायची, नवीन चेकबुक घ्यायचे, केवायसी (KYC) अपडेट करायचे असेल, तर उद्या या कामांसाठी मोठी अडचण येऊ शकते.चेक क्लिअरन्समध्ये विलंब:चेक क्लिअर करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने सरकारी बँकांमार्फतच होते. संपामुळे चेक क्लिअर होण्यास 2 ते 3 दिवसांचा उशीर होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे पेमेंट अडकण्याची शक्यता आहे. ATM मध्ये रोख टंचाई:सलग तीन दिवस बँका बंद राहिल्यामुळे एटीएममध्ये रोख रक्कम संपण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः लहान शहरे आणि निवासी भागांतील एटीएम उद्या रिकामे मिळण्याची शक्यता आहे.कर्ज व सरकारी कामांवर परिणाम:जर तुमचे कर्ज मंजुरी, बँक एनओसी (NOC) किंवा इतर सरकारी कामे प्रलंबित असतील, तर ती आता बुधवार किंवा गुरुवारपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.advertisementकोणत्या सेवा सुरू राहणार?UPI आणि डिजिटल पेमेंट:गुगल पे, फोनपे, पेटीएम, भीम UPI यांसारख्या सर्व डिजिटल पेमेंट सेवा पूर्णपणे सुरू राहतील. दुकानात खरेदी किंवा ऑनलाइन व्यवहार करताना कोणतीही अडचण येणार नाही.इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग:मोबाइल अॅप किंवा संगणकाद्वारे IMPS, NEFT, RTGS सारखे पैसे ट्रान्सफर, बॅलन्स तपासणे, बिल पेमेंट आदी सेवा सुरू राहतील. खासगी बँका:HDFC बँक, ICICI बँक, Axis बँक यांसारख्या सर्व प्रमुख खासगी बँका नेहमीप्रमाणे खुल्या राहतील आणि त्यांच्या ग्राहकांचे कामकाज सुरळीत चालू राहील.एटीएम सेवा:तांत्रिकदृष्ट्या एटीएम बंद केले जाणार नाहीत. एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध असल्यास, कार्डद्वारे पैसे काढता येतील. मात्र रोख संपल्यास अडचण येऊ शकते.एकूणच, सरकारी बँकांचा संप लक्षात घेता नागरिकांनी महत्त्वाची बँकिंग कामे पुढे ढकलणे किंवा डिजिटल पर्यायांचा वापर करणे अधिक सुरक्षित ठरेल.

.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List