शिंदेसेनेला नोचान्स "मुंबईचा महापौर भाजपचाच करा" दिल्लीवरून कडक संदेश ; या तारखेला होणार मुंबईचा महापौर ! आतली बातमी फुटली

शिंदेसेनेला नोचान्स

मुंबई : मुंबई महापालिकावर महायुतीचा महापौर बसणार असल्याचे विधान महायुतीमधील नेत्यांकडून केले जात आहे. महापौर भाजपचा होईल की शिवसेनेचा हे महत्वाचं नाही तर मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाररहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास घडवणं हे महत्वाच असल्याचे मोठं विधान भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी केले होते. त्यानंतर आता महापौरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचे भाजपच्या बड्या नेत्याने केलेल्या विधानामुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्यापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना पक्षांनी एकत्रित लढवली होती. भाजप मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपचा महापौर हे आता निश्चित मानले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईत भाजपचाच महापौर बसवण्यासाठीच्या घडामोडींना वेग आला असून, त्यानुसार येत्या 30 जानेवारीला मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर कारभाराची सूत्रे हाती घेणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. याबाबत भाजपच्या एका बड्या नेत्याने दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये खुलासा केला आहे.

आज भाजपसाठी मोठा दिवस आहे, याचे कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर नितीन नबीन यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाला असून ते भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. यानिमित्ताने भाजपचे मुंबई आणि महाराष्ट्रातील नेते दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. याच नेत्यांच्या गोटातून येत्या 30 तारखेला भाजपचा महापौर मुंबईची सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी 114 नगरसेवकांचे संख्याबळ गरजेचे असणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपला शिंदेंसेनेच्या २९ नगरसेवकांना सोबत घेणे गरजेचे असणार आहे. मात्र, शिंदेंनी मोठी खेळी करत आपल्या नगरसेवकांना ताज हॅाटेलमध्ये ठेवले आहे. या नगरसेवकांचा आणखी काही दिवस मुक्काम वाढला आहे. एकप्रकारे दबाव तंत्राचा वापर महापौर पदासाठी शिदेंनी केला असल्याची चर्चा आहे. मात्र, याचा काही परिणाम झाला नसल्याची चर्चा रंगली आहे.

मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपने दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे यंदा महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे मित्रपक्षांना समजावून सांगा, असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला होता. त्यामुळे भाजप मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसणार असल्याची जवळपास निश्चित झाले आहे.
२२ जानेवारीला मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर नेमका कुणाला महापौर पदासाठी संधी द्यायची हे निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ बसणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

येत्या दोन दिवसांत महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाचे शक्तिप्रदर्शन करत एकत्र नोंदणी कोकण भवन येथे होणार आहे. कोकण भवन येथील नगर विकास मंत्रालयाच्या कार्यालयात भाजप आणि शिवसेनेचे विजयी नगरसेवक एकत्र पक्ष गट स्थापनेची अधिकृत नोंदणी करणार आहेत.

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार :  राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
    छत्रपती संभाजीनगर : देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या उघड व छुप्या
जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
मराठवाडा मूर्तीने समृद्ध परिपूर्ण असणारा भूप्रदेश -डॉ. माया पाटील 
प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान
संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 
जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....
विवेकानंद शिक्षण संस्था संचलित मराठा हायस्कूल, चौराहा येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी
Join Us on Whatsapp