शिवसेना शिंदेंकडून एमआयएमला युतीचा प्रस्ताव? राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

शिवसेना शिंदेंकडून एमआयएमला युतीचा प्रस्ताव? राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांना मोठे यश मिळाले असतानाच, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) ने देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. राज्यात एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा किंवा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला आहे. मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, धुळे आदी ठिकाणी पक्षाने मोठ्या संख्येने जागा जिंकल्या आहेत.

विशेषतः मालेगाव महानगरपालिकेत एमआयएमने २१ नगरसेवक निवडून आणले आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक मोठा दावा केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमके काय म्हणाले इम्तियाज जलील?जलील यांनी सांगितले की, “मालेगाव सारख्या ठिकाणी आमचे २१ नगरसेवक निवडून आले आहेत. तिथे महापौर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून स्थानिक नेत्यांना एक प्रस्ताव आला होता – ‘आपण सोबत येऊ शकता का?’ असा हा प्रस्ताव होता. परंतु आमचे तिकडचे स्थानिक आमदार आणि नेत्यांनी ठामपणे नकार दिला. आम्ही भाजप सोबत किंवा शिवसेना (शिंदे गट) सोबत जाणार नाही, असे स्पष्ट पत्रकार परिषदेत सांगितले.” या दाव्यामुळे महायुतीतील सत्तासमीकरणांवर नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भाजप विरोधात एकत्र येण्याची शक्यताजलील यांनी पुढे म्हटले की, राज्यातील तीन ते चार महापालिका अशा आहेत जिथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. “वेळ पडली तर सर्व पक्ष एकत्र येतील. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट सांगितले आहे की, सन्मानाने तुम्ही आमचा सपोर्ट मागत असाल तर नक्कीच आम्ही पॉझिटिव्ह विचार करू.” एमआयएमने भाजपबरोबर सत्ता भागीदारी न करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

नोटा उधळण्याच्या आरोपावर स्पष्टीकरणदरम्यान, विजयानंतर झालेल्या जल्लोष कार्यक्रमात नोटा उधळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर जलील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “त्या ठिकाणी आमचे निवडून आलेले ३३ नगरसेवक उपस्थित होते. जल्लोषाचा कार्यक्रम होता. एका गायकाला बोलावले होते. काही उत्साही लोकांनी पैसे उधळले. यात मी किंवा पक्षाने काही मोठा गुन्हा केला असा मला वाटत नाही. ही सामान्य उत्साहाची बाब आहे.”

एमआयएमची कामगिरीमहापालिका निवडणुकांमध्ये एमआयएमने राज्यभरात १००+ जागा जिंकल्या आहेत. मालेगावमध्ये २१, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३३, नांदेडमध्ये १४, अमरावतीमध्ये १३ इत्यादी ठिकाणी पक्षाने मजबूत कामगिरी केली आहे. मुंबईतही पक्षाला पहिल्यांदाच जागा मिळाल्या आहेत. इम्तियाज जलील यांच्या या खुलाश्यामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात नवे वळण लागण्याची शक्यता आहे. आता शिंदे गट आणि भाजप यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IMG-20251117-WA0399

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार :  राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
    छत्रपती संभाजीनगर : देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या उघड व छुप्या
जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
मराठवाडा मूर्तीने समृद्ध परिपूर्ण असणारा भूप्रदेश -डॉ. माया पाटील 
प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान
संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 
जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....
विवेकानंद शिक्षण संस्था संचलित मराठा हायस्कूल, चौराहा येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी
Join Us on Whatsapp