मुंबई मेरी जान......पण नेमकी कुणाची, मुंबईच्या निकालामध्ये मोठा ट्विस्ट ! आकडे फिरले, ठाकरेंकडून कडवी झुंज

मुंबई मेरी जान......पण नेमकी कुणाची, मुंबईच्या निकालामध्ये मोठा ट्विस्ट ! आकडे फिरले, ठाकरेंकडून कडवी झुंज

मुंबई महानगरपालिका (BMC) सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून २३ वेगवेगळ्या केंद्रांवर सुरू आहे. मात्र संध्याकाळपर्यंत आलेल्या कलांमुळे चित्र अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. दुपारच्या सत्रात महायुती (भाजप + एकनाथ शिंदे गट) बहुमताच्या आकड्याच्या जवळ पोहोचली असताना, संध्याकाळी अनेक वॉर्डांमध्ये ठाकरे गट (शिवसेना UBT) आणि मनसे यांनी निकराची झुंज देत महायुतीच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे. एकाच वेळी फक्त दोन वॉर्डांची मतमोजणी होत असल्याने निकालात सतत बदल होत आहेत आणि ही प्रक्रिया अत्यंत नाट्यमय बनली आहे.
पक्षनिहाय कल/निकाल (संध्याकाळपर्यंत उपलब्ध)(एकूण २२७ जागा, बहुमतासाठी ११४ आवश्यक)

– भाजप – ८२ जागा– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ६३ जागा– शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – २६ जागा– काँग्रेस – २२ जागा– ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) – ८ जागा– मनस – ७ जागा– समाजवादी पार्टी – २ जागा– राष्ट्रवादी (अजित पवार गट) – २ जागा– राष्ट्रवादी (शरद पवार गट) – १ जागा
महायुती (भाजप + शिंदे गट) एकूण १०८ जागांवर पोहोचली असून, बहुमताच्या फक्त ६ जागांच्या अंतरावर आहे. दुसरीकडे ठाकरे गट (UBT + मनसे) एकूण ७० जागांवर मजबूत आघाडी घेत आहे.

दुपारी जल्लोष, संध्याकाळी सावधगिरीदुपारी काही वेळ महायुतीने ११४+ जागांचा आकडा गाठल्याचा दावा केला होता. त्यानिमित्ताने भाजपने विजयाचे जल्लोष कार्यक्रमही आयोजित केले होते. मात्र संध्याकाळपर्यंत कल बदलत गेल्याने पक्षाने विजयाबाबत आक्रमक भाष्य करण्याचे टाळले आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अद्याप स्पष्ट प्रतिक्रिया देणे टाळले असून, अंतिम निकाल येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे धोरण अवलंबले आहे.
गिरणगावात ‘ठाकरे’ फॅक्टरचा दबदबामुंबईत महायुतीने एकूणच मुसंडी मारली असली तरी, पारंपरिक गिरणगाव भागातील मतदारांनी मात्र ठाकरे कुटुंबीयांना प्राधान्य दिले आहे. शिवडी आणि लालबाग विधानसभा क्षेत्रातील ६ महत्त्वाच्या वॉर्डांपैकी ५ वॉर्डमध्ये शिवसेना (UBT) आणि मनसे यांनी एकत्रितपणे विजय मिळवला आहे. या भागात ठाकरे बंधूंनी (उद्धव आणि राज ठाकरे) मजबूत प्रभाव दाखवला असून, महायुतीला या ऐतिहासिक बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.

एकूण चित्रमुंबई महापालिकेची सत्ता कोणाकडे जाईल, हे अद्याप अनिश्चित आहे. मतमोजणी प्रक्रिया अजूनही सुरू असून, शेवटच्या टप्प्यातील अनेक वॉर्डांमधील निकाल निर्णायक ठरणार आहेत. दुपारी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता पूर्णपणे ‘काँटे की टक्कर’ मध्ये रूपांतरित झाली असून, रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या राजकारणातील हा निकाल राज्याच्या भावी राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकणारा ठरणार आहे.

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

IMG-20251117-WA0399

 

 

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp