प्रचार साहित्य महागले; झेंडे, बिल्ले, टोप्यांना मोठी मागणी
मुंबई : प्रतिनिधीमुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने उमेदवारांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर अनेक उमेदवार भर देत आहेत. प्रचारावेळी आपाल्या पक्ष व पक्षचिन्हाची ठळक ओळख मतदारांना व्हावी यासाठी प्रचार साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. सध्या बाजारात टोपी, बिल्ले, बेंज यांच्या मोठ्या मागणीमुळे त्यांच्या दरांतही मोठी वाढ झाल्याचे जाणकारांनी सांगितले.निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी १५ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. त्या मर्यादेत राहून उमेदवारांना प्रचारासाठी खर्च करावा लागणार आहे. मात्र, प्रचार साहित्याचे वाढलेले दर पाहता खर्चाचा ताळमेळ बसविण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांचे चिन्ह कायम असल्याने त्या पक्षांच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात एकसारख्या प्रचार साहित्याची खरेदी होत आहे. मात्र, अपक्ष उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाल्याने आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी टी-शर्ट, बिल्ले, टोप्यांवर चिन्ह छापण्यासाठी दुकानदारांकडे विशेष ऑर्डर द्याव्या लागत आहेत.
स्वतंत्र कार्यकर्ते नियुक्तप्रचार रॅली, चौक सभा आणि कॉर्नर सभांमधून आपल्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांचा दिवसभराचा खर्च सांभाळताना अनेक उमेदवारांची तारांबळ उडत आहे. निवडणूक आयोगाला दररोजच्या खर्चाची नोंद सादर करणे बंधनकारक आहे. वाढता खर्च, कडक नियम व मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या स्पर्धेमुळे निवडणूक उमेदवारांसाठी चांगलीच आव्हानात्मक ठरत आहे.
अपक्ष उमेदवारांची चिन्हे खर्चिककाही राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांसाठी बिल्ले, बॅच, टोप्या, उपरणे यांची घाऊक खरेदी केली आहे. त्या-त्या पक्षांकडून त्यांना ते साहित्य दिले जाईल. मात्र, अपक्ष उमेदवारांची चिन्हे बनविण्यासाठी आम्हाला विशेष मेहनत करावी लागत आहे. जास्त ऑर्डर असल्यास भाव कमी असतो. पण, ऑर्डर कमी असल्यास भाव वाढतो.
शाही पगडीला जास्त मागणी
सध्या झेंडे, उपरणे, टोप्या, बॅचेस आणि विविध पक्षांचे चिन्ह, पगडी यांना गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.सध्या मोठ्या प्रमाणात डिजिटलचा वापर करून उमेदवारांकडून प्रचार होताना पाहायला मिळत आहे. डिजिटल प्रचारामुळे प्रत्यक्ष वस्तू खरेदी कमी झाली आहे. पूर्वी जे मोठ्या प्रमाणावर झेंडे, टोप्या खरेदी केल्या जायच्या ते आता खरेदी होत नाही. तसेच महागाईचा फटका देखील बसला आहे. त्यामुळे रॉ मटेरियलचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. पण सोशल मीडियामुळे व्यवसाय कमी झाल्याने जाणूनबुजून जुनेच दर लावण्यात आले आहेत.

.jpeg)


About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List