काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून सुरेश कलमाडी हे आजाराने ग्रस्त होते. त्यातूनच कलमाडी यांची प्राणज्योत ६ डिसेंबर रोजी मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता मालवली. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९६० मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. १९६४ ते १९७२ या काळात त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली. त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
१९७७ मध्ये कलमाडी यांनी पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ते पुण्यातून तीन वेळा लोकसभेवर निवडून आले. तसेच त्यांनी चार वेळा राज्यसभा सदस्य म्हणूनही काम केले. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते रेल्वे राज्यमंत्री होते. रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे ते पहिले राज्यमंत्री ठरले होते.
ते १९९६ ते २०१२ या प्रदीर्घ काळासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनाचे अध्यक्ष होते. त्यांनी एशियन अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. पुण्यात दरवर्षी होणारी ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ आणि ‘पुणे फेस्टिव्हल’ सुरू करण्याचे श्रेय कलमाडी यांना जाते.
२०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून कलमाडी यांना २०११ मध्ये अटक करण्यात आली होती आणि काही काळ तुरुंगवासही झाला होता.
तब्बल १५ वर्षांनंतर, २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी त्यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. न्यायालयाने तो मान्य केल्याने कलमाडी यांना या सर्व आरोपांतून क्लीन चीट मिळाली.गेल्या काही वर्षांपासून कलमाडी हे सक्रिय राजकारणापासून दूर होते. अलीकडेच त्यांना प्रकृती बिघडल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास कलमाडी यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List