भाजपच्या दोन इच्छुक उमेदवारांमध्ये हाणामारी, एकाचे कार्यालय फोडले तर मध्यस्थीसाठी आलेल्या मनसे नेत्याची हत्या झाली.......
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे विरुद्ध बंडखोर उमेदवार रेखा सरवदे यांच्या अर्ज माघारीवरून दोन गटांत टोकाचा वाद झाला. या वादात भाजपच्या जोशी गल्लीतील शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याच राड्यात मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महापालिका परिसरातील घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.
नेमकं काय घडलं?
सोलापूर महापालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला. प्रभाग दोनमध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्याविरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठा वाद झाला, या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले.
मात्र, त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
मनसेचा गंभीर आरोप
मनसे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत इंगळे यांनी सांगितले की, “भाजपकडून प्रभाग २ चे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी मोठा दबाव होता. सरवदे कुटुंबावर दबाव आणला जात होता. समाजात वाद नको म्हणून मध्यस्थी करण्यासाठी बाळासाहेब सरवदे गेले होते. शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केली.” ही घटना राजकीय वादातून घडल्याचा त्यांचा ठाम दावा आहे.
कार्यालयाची तोडफोड
नाराज सरवदे गटाने शंकर शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या काहींना ताब्यात घेतले असून, हत्येच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List