पैसे नाही म्हणून तिकीट नाकारल्याने ‘या’ महिला नेत्याने भाजप दिला मोठा इशारा
कोल्हापूर : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. आपल्याला तिकीट मिळावे म्हणून उमेदवार सध्या पक्ष नेतृत्वाकडे वशिला लावताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर अनेक उमेदवारांनी तिकीट मिळावे म्हणून अक्षरशः देव पाण्यात ठेवले आहेत. काही ठिकाणी उमेदवारांना तिकीट मिळत आहे तर काही ठिकाणी नाकारलं जात आहे. यादरम्यान कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
कोल्हापूर भाजपच्या निष्ठावंत सरचिटणीस धनश्री तोडकर यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. धनश्री तोडकर यांनी पक्षाला एक पत्र लिहून मंगळवारी भाजपाच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचं जाहीर करून टाकलं असून आज माझी आर्थिक परिस्थिती नसल्याच्या कारणामुळे पक्षाने तिकीट नाकारल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
धनश्री तोडकर यांनी पत्रात काय लिहिलं?मी धनश्री सचिन तोडकर, सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगर, मी गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे करत आहे, काही महिन्यापूर्वी माझे पती कै. सचिन तोडकर यांचे निधन झालं. त्यांच्या निधनानंतर स्वतःला सावरून मी पक्षाचं काम अखंडित ठेवलं. पक्षाचा एकही कार्यक्रम किंवा एकही बैठक चुकवली नाही. कोल्हापूर शहरात इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा मोठे कार्यक्रम मी एकटी महिला असून घेतलं.
पण आज माझी आर्थिक परिस्थिती नाही, या कारणामुळे पक्ष मला तिकीट नाकारत आहे. मी पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असल्याने पक्षाची विचारधारा सोडू शकत नाही. तिकीट न मिळाल्याने माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने मी उद्या मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे.आपली,धनश्री सचिन तोडकरसरचिटणीस, भारतीय जनता पार्टी.


.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List