एमपीएससी परीक्षेच्या उत्तरप्रत्रिकेत आता पाचव्या पर्यायासह अनेक नवीन बदल वाचा नवीन वर्षापासून लागू होणारे महत्त्वाचे बदल

एमपीएससी परीक्षेच्या उत्तरप्रत्रिकेत आता पाचव्या पर्यायासह अनेक नवीन बदल वाचा नवीन वर्षापासून लागू होणारे महत्त्वाचे बदल

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतल्या जाणा-या विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत व्­यापक बदल करण्­यात आले आहेत. यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, हे नवीन बदल १ मार्च २०२६ नंतर होणा-या सर्व परीक्षांसाठी लागू होणार आहेत.महाराष्­ट्र लोकसेवा आयोग उत्तरपत्रिकेत केलेले सर्व सुधारित नियम आणि नवीन उत्तरपत्रिका पद्धत १ मार्च २०२६ पासून आयोजित केल्या जाणा-या सर्व भरती प्रक्रिया आणि परीक्षांसाठी लागू होईल. उमेदवारांना मार्गदर्शनासाठी सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या (कार्बनलेस कॉपी) मागे देण्यात येणार आहेत, असेही आयोगाने स्­पष्­ट केले आहे. दरम्यान उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी स्वाक्षरी केली नाही. काळ्या बॉल पॉईंट पेनव्यतिरिक्त इतर पेन वापरणे, उत्तरपत्रिकेवर अनावश्यक चिन्हे किंवा मजकूर लिहिणे, प्रश्नपुस्तिका क्रमांक नमूद न करणे, उत्तरपत्रिकेवरील दफ कोड किंवा टायमिंग ट्रॅक खराब करणे आदी चुका उमेदवारांनी केल्­यास त्­यांची उत्तरपत्रिका अवैध ठरवली जाईल, असेही आयोगाने प्रसिध्दीपत्रक नमूद केले आहे.

काय आहेत बदल?महाराष्­ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्दीपत्रक नमूद केले आहे की, मूळ उत्तरपत्रिका दोन भागांत विभागली जाईल. ती भाग-१ आणि भाग-२ अशी असेल. भाग-१: हा भाग केवळ उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी असेल. तर भाग-२ : यामध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि स्वाक्षरी यांसारखा वैयक्तिक तपशील असेल.

मूल्यमापन प्रक्रियेत अधिक गोपनीयतापरीक्षा संपल्यानंतर समवेक्षक उत्तरपत्रिकेतील भाग-१ आणि भाग-२ वेगळे करतील. यामुळे उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापन प्रक्रियेत अधिक गोपनीयता राखली जाणार असल्­याची माहिती महाराष्­ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.

…तर उमेदवाराला पाचवा पर्याय अनिवार्यसर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता उत्तरपत्रिकेवर चार ऐवजी पाच पर्याय असतील. उमेदवाराला एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल, तर त्याला पाचवा पर्याय निवडणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नासाठी पाच पैकी एक तरी वर्तुळ छायांकित करणे आवश्यक आहे. उमेदवाराने पाच पैकी एकही वर्तुळ रंगवले नाही, तर त्या प्रश्नासाठी २५% (१/४) गुण वजा केले जातील, असेही आयोगाने स्­पष्­ट केले आहे.

बैठक क्रमांकात बदलाबाबतउमेदवारांचा बैठक क्रमांक आता ८ अक्षरी ऐवजी ७ अंकी असेल. विशेष म्हणजे, हा बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीच्या संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी कायम स्वरूपी राहणार आहे.

नेगेटिव्ह मार्किंगचे नियम अधिक कडकचुकीचे उत्तर देणे, पाचपैकी एकही पर्याय न निवडणे, एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे, उत्तरामध्ये खाडाखोड किंवा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकरणांमध्ये प्रत्येक प्रश्नामागे २५% किंवा १/४ गुण एकूण गुणांमधून वजा केले जाणार आहेत. तसेच गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती तशीच ठेवली जाणार आहे.

IMG-20251117-WA0399

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

 

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp