मंत्रिपद येतं अन् जातं, ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पद तेही जाणार…; फडणवीसांच्या विधानावर मुनगंटीवार यांचा पलटवार
चंद्रपूर : रविवारी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला, या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र जरी असं असलं तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळवता आलं नाही, यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांना ताकद देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता मुनगंटीवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. मला ताकदीची गरज नाही, मी ताकद नसतानाही काम करतो असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच महापालिका निवडणुकीनंतर राज्यभरात दौरा करणार असल्याची घोषणा देखील यावेळी मुनगंटीवार यांनी केली आहे.
महापालिका निवडणुका झाल्यावर मी राज्यभर दौरा करणार असून, यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. भाजपमध्ये कुणी नाराज राहू शकत नाही. त्यामुळे या दौऱ्यात सर्वांच्या भेटी घेणार आहे. अशी माहिती यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार यांना ताकद देऊ असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं, यावर पलटवार करताना मला ताकदीची गरज नाही. ताकद नसतानाही मी कामे करतो, अनेक कामे मी केलेली आहेत. असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
मी कधीच नाराज नसतो, माझ्या आयुष्यात भगवान महादेवाने मला नाराज न होण्याची शक्ती दिली आहे. मला मंत्रिपद न दिल्याची नाराजी नाही पण ती जनतेमध्ये आहे. मंत्रिपद येतं आणि जातं. मुख्यमंत्री पदही ज्यांचे आहे त्यांचे येणार आहे जाणारही आहे. पर्मनन्ट कोणी नाहीये. शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही मंत्री नाही, आमदार, खासदार नाही किंवा मुख्यमंत्री नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.


.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List