४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  कवी  फ. म. शहाजिंदे यांची निवड बीड जिल्ह्यातील शांतीवन येथे ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन 

४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  कवी  फ. म. शहाजिंदे यांची निवड बीड जिल्ह्यातील शांतीवन येथे ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन 

 

छत्रपती संभाजीनगर  : २१ : छत्रपती संभाजीनगर येथे आज मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे यांची शांतीवन ता. शिरूर कासार, जि. बीड येथे होणाऱ्या ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनासाठी शांतीवनचे संस्थापक श्री.  दीपक  नागरगोजे, यांचे निमंत्रण होते. त्यांच्या शांतीवन प्रकल्प आर्वी, ता. शिरूर कासार या सेवाभावी संस्थेत एप्रिल महिन्यात होईल. 
फ. म. शहाजिंदे  यांची  ‘निधर्मी’, ‘आदम’, ‘ग्वाही’, ‘झोंबणी’, ‘शेतकरी’ इत्यादी कवितासंग्रह; ‘मी तू’ ही कादंबरी तर ‘सारांश’, ‘इत्यर्थ’, ‘शब्दबिंब’ इत्यादी समीक्षाग्रंथ; ‘वाकळ’, ‘प्रत्यय’, ‘अनुभव’ हे लेखसंग्रह; ‘मराठवाड्यातील कविता’, ‘पुरचुंडी’, ‘मूठभर माती : आशय व अन्वयार्थ’, ‘मुस्लिम मराठी साहित्य : प्रेरणा आणि स्वरूप’ ही संपादने प्रसिद्ध आहेत.
यापूर्वी ते पाचवे मराठवाडा युवक साहित्य संमेलन, वाकुळणी, जि. जालना, पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, सोलापूर, अकरावे अंकुर साहित्य संमेलन, लोणार, जि. बुलडाणा, पहिले लातूर जिल्हा मराठी साहित्य संमेलन, निलंगा जि. लातूर, पाचवे पुरोगामी मराठी साहित्य संमेलन, कंधार जि. नांदेड, तिसरे शेकोटी साहित्य संमेलन, धारगळ, गोवा इत्यादी साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविलेली आहेत. 
         आपल्या लेखनासाठी त्यांना विविध साहित्य संस्थांचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यात कवी केशवसुत काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचा अंबाजोगाई साहित्य पुरस्कार, हमीद दलवाई साहित्य पुरस्कार (मुंबई),  मारुती मगर साहित्य सेवा पुरस्कार (लातूर), तुका म्हणे साहित्य पुरस्कार, (बुलडाणा), शिक्षक रत्न पुरस्कार (मुंबई), सुशीलकुमार शिंदे साहित्य गौरव पुरस्कार (सोलापूर)  इत्यादींचा समावेश आहे. 
त्यांच्या दीर्घ वाङ्‌मयीन लेखनाचा विचार करून या ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने मराठवाडा साहित्य परिषदेने निवड केली आहे. या बैठकीस अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह डॉ. गणेश मोहिते, डॉ. दीपा क्षीरसागर व कार्यकारिणी सदस्य श्री. कुंडलिक अतकरे, प्रा. किरण सगर, श्री. दगडू लोमटे, श्री. देवीदास फुलारी, डॉ. हेमलता पाटील, डॉ. ऋषीकेश कांबळे, डॉ. संजीवनी तडेगावकर, सौ. सरोज देशपांडे, श्री. संजीव कुलकर्णी, श्री. सुभाष कोळकर, श्री. विलास सिंदगीकर, डॉ. समिता जाधव, श्री. श्रीधर नांदेडकर, डॉ. हंसराज जाधव, डॉ. दिलीप बिरुटे, प्रभाकर साळेगावकर, श्री. मोहिब कादरी हे सदस्य उपस्थित होते.

IMG-20251117-WA0399

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

 

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp