महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनेसाठी सरकारकडे मागणी करणार - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनेसाठी सरकारकडे मागणी करणार - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

भाजप एक पक्ष म्हणून सत्ताधारी महायुती सरकारकडे ओबीसी जनगणनेची मागणी करणार असल्याचे सूतोवाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातही बिहारसारखी जातनिहाय जनगणना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आशिष देशमुखांनी केली मागणी

बिहारमधील नितीशकुमार सरकारने जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जारी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अशी जनगणना करण्याची मागणी होत आहे. भाजप नेते आशिष देशमुख यांनी सोमवारी उघडपणे ही मागणी केली. बिहार सरकारने आजच ओबीसींच्या गणनेची आकडेवारी जारी केली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही अशी जनगणना करण्याची गरज आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारकडे अशी मागणी करावी अशी आम्ही विनंती करतो, असे ते म्हणाले.

भाजप ओबीसींच्या गणनेची मागणी करणार

आशिष देशमुख यांच्या या विनंतीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप एक पक्ष म्हणून शिवसेना, भाजप व महायुतीच्या सरकारकडे ओबीसींची गणना करण्याची मागणी करेल, असे स्पष्ट केले. ते भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत बोलत होते. बिहारच्या अहवालानंतर आशिष देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारने ओबीसींची आर्थिक सामाजिक आकडेवारी गोळा करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार भाजप सरकारला असा सर्वे करून त्यासंबंधीची आकडेवारी जारी करण्याची मागणी करेल, असे बावनकुळे म्हणाले.

काँग्रेसच्या भूमिकेने सरकारवर दबाव

उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर देशभरात जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारची चांगलीच गोची झाली आहे. विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रातही ओबीसींची जनगणना करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यातच नितीशकुमार यांनी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जारी केल्यामुळे आता सरकारवर अशी गणना करण्याचा मोठा दबाव वाढला आहे.IMG-20230705-WA0295

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp