यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज १६ नोव्हें. बालरंगभूमी परिषदेच्या जल्लोष लोककला महोत्सवात बालकांचा नृत्य, गायन आणि वादन यांचा कलाविष्कार. अभिनेत्री आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के - सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे लोककलांची माहिती व महती लहान मुलांमुलींपर्यंत पोहचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ हा महोत्सव राबवण्यात येत आहे. या लोककला महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून छत्रपती संभाजीनगर शहरात १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर या ठिकाणी होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्तीच्या अध्यक्ष नीलमताई शिर्के सामंत यांच्या हस्ते होणार आहे यावेळी बालरंगभूमी परिषदेचे मध्यवर्तीचे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके यांची उपस्थिती राहणार आहे.
या महोत्सवाची प्राथमिक फेरी ही ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे. निवड झालेल्या संघाचे व एकल सादरीकरणाचे या महोत्सवात इयत्ता १ ली ते १० वी चे बालकलावंत लोककला या प्रकारातील वाघ्या मुरळी, धनगरी नृत्य , लावणी ,धनगर गीत, कोळी गीत, गवळण, शेतकरी गीतमंगळ गौरा, लेझीम , गोंधळ, जागरण , जोगवा, भारुड, गोंधळ, बंजारा गीत ,वासुदेव, पोवाडा, ढोलकी वादन, मृदुंग वादन इत्यादी महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण समूह नृत्य, समूह गायन, एकल गायन, एकल नृत्य व एकल वादन अशा स्पर्धाद्वारे करणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. सहभागी सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या सर्व सहभागी संघांना २,००० हजार रुपये प्रत्येकी मानदेय रक्कम व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.
समूह नृत्य आणि समूह गीत स्पर्धेकरिता सर्वोत्कृष्ट रु. ४ हजार रोख व स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट रु.३ हजार रोख व स्मृतिचिन्ह, उत्तम रु.२ हजार रोख व स्मृतिचिन्ह तसेच प्रशंसनीय ठरणाऱ्या दोन समूह नृत्य व समूह गीतांना प्रत्येकी १ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. एकल नृत्य , एकल वाद्य वादन, एकल गायन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बालकलावंतांना सर्वोत्कृष्ट २,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट १ हजार ५०० रुपये रोख व स्मृतिचिन्ह, उत्तम १ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह तर प्रशंसनीय ठरणाऱ्या दोन कलावंतांना ५०० रुपये रोख व स्मृतिचिन्ह पारितोषिक स्वरुपात देण्यात येणार आहे.
बालरंगभूमी परिषदेने आयोजित केलेल्या ‘जल्लोष लोककलेचा’ हा महोत्सव शहरवासीयांसाठी लोककलेची एक मेजवानी असून तो पाहण्यासाठी निःशुल्क आहे.
या महोत्सवाचा आनंद कला रसिकांनी घ्यावा असे आवाहन बालरंगभूमी परिषद संभाजीनगर जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले आहे.





About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List