वाचा, मनोज जरांगेंच्या बैठकीत कुणाचा हल्ला ? कार्यकर्त्यांची पळापळ; पाटलांना उपरण्याने झाकत सुरक्षित स्थळी नेले
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित बैठकीत आज दुपारच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठवाड्यातील समन्वयकांची बैठक सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने एकच पळापळ झाली. या अनपेक्षित घटनेमुळे बैठकीत व्यत्यय आला आणि अनेक कार्यकर्त्यांना मधमाशांनी दंश केल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. यावेळी कार्यकर्त्यांनी मनोज जरांगेंना उपरण्याने झाकत सुरक्षित स्थळी नेले.
बैठकीतील चर्चेआधीच माशांचा हल्ला
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटीमध्ये मराठा समन्वयकांची बैठक बोलावली होती. या बैठकीची तयारी सुरू असताना आणि चर्चा सुरू होण्याच्या काही वेळातच अचानक मधमाशांचे मोहोळ आले. त्यांनी थेट उपस्थितांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक समन्वयक आणि कार्यकर्त्यांना मधमाशांनी चावे घेतल्याने बैठकस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
जरांगेंना सुरक्षित स्थळी हलवले
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, कार्यकर्त्यांनी तात्काळ मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर इजा होऊ नये म्हणून सहकाऱ्यांनी त्यांच्या गळ्यातील उपरणे काढून त्यांना झाकले. तसेच, काही कार्यकर्त्यांनी अंगावर रुमाल घेऊन त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी नेले. या गोंधळात पोलिसांचीही धावपळ उडाली. मधमाशांच्या या हल्ल्यामुळे बैठकीत काही वेळासाठी व्यत्यय आला. पण नंतर ही बैठक सुरू झाली.
जरांगेंची आजची बैठक कशासाठी?
दरम्यान, यावेळी मनोज जरांगे यांनी मधमाशांच्या हल्ल्यापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होत. ते म्हणाले, आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध करत नाही. सर्वांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करायला हवे. या विषयीची चर्चा आजच्या बैठकीत होणार आहे. तर इतर अनेक विषयांवर पण चर्चा होणार आहे. तालुक्यातील मराठा सेवकांची आणि मराठा समाजाला मदत करणाऱ्यांची ही बैठक आहे. आजच्या बैठकीसाठी अभ्यासक नाही, आज मराठा तालुका सेवक आणि मराठवाड्यातील प्रमुखांना बोलवले आहे.
... तर मग दंगली घडल्या असत्या
अंतरावली सराटीत झालेल्या दंगलीच्या मागे शरद पवारांचा आमदार होता असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता, त्यावर आता जरांगेंनी उत्तर दिले आहे. जर आंदोलनामागे राजकीय लोक असते, तर गोंधळ झाला असता, दंगली घडल्या असत्य, असे ते म्हणाले.






About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List