भुजबळांचे बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

भुजबळांचे बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

मुंबई : महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने छगन भुजबळ आणि इतरांविरोधातील २०२१ च्या बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या विशेष कोर्टाने हे आदेश १६ सप्टेंबरला दिले आहेत. खटला रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिट वर नसून केवळ तांत्रिक मुद्यांवर असल्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार आहे.

इन्कम टॅक्स विभागाने २०२१ मध्ये छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे फर्म आर्मस्ट्रॉन्ग इन्फ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड, परवेश कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड आणि देविशा कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड विरोधात बेनामी संपत्ती प्रकरणी कार्यवाही सुरु केली होती. विशेष कोर्टाने नोव्हेंबर २०२१ मध्ये या प्रकरणात समन्स जारी केले होते. हे समन्स छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना जारी करण्यात आले होते. भुजबळ यांनी आयकर विभागाच्या कारवाईला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते.

डिसेंबर २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने तक्रार रद्द करण्याचे आदेश दिले होते. ज्यामध्ये कथित बेनामी संपत्तीचा आरोप करण्यात आला होता. त्या मालमत्ता त्यांच्याशी संबंधित तीन कंपन्यांच्या नावावर होती. ज्या मालमत्ता मुंबई, नाशिकची गिरणा शुगर मिल्सचा समावेश आहे. एमपी/एमएलए प्रकरणांचे विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंधर यांनी मंगळवारी एक आदेश देताना म्हटले की मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्यांवर होते. दरम्यान, या प्रकरणी छगन भुजबळ यांच्या बाजूने प्रतिक्रिया समोर आलेली नाही

.IMG-20240814-WA0257

IMG-20240817-WA0005

IMG-20230723-WA0310

IMG-20240924-WA0354

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp