मराठी तरुणान नवीन उद्योग आणि कर्ज देणार स्वतःचं ‘छावा राईड’ ॲप; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मराठी तरुणान नवीन उद्योग आणि कर्ज देणार स्वतःचं ‘छावा राईड’ ॲप; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवा कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी आणि स्थानिक मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने छावा राईड ॲप लाँच करण्याची घोषणा केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत ही माहिती दिली. या ॲपद्वारे रिक्षा, टॅक्सी आणि बस तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
बैठकीत अंतिम मसुद्यावर चर्चामंत्रालयातील परिवहन मंत्र्यांच्या दालनात केंद्र आणि राज्य सरकारच्या ॲग्रीगेटेड पॉलिसी(समुच्चयक धोरण) अंतर्गत यात्री ॲपच्या अंतिम मसुद्यावर चर्चा झाली. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या ॲपच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रवाशांना परवडणारी आणि विश्वासार्ह वाहतूक सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट आहे.

मराठी तरुणांना रोजगार आणि आर्थिक पाठबळछावा राईड ॲपच्या माध्यमातून राज्यातील मराठी तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. विशेष म्हणजे, वाहन खरेदीसाठी आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या तरुणांना मुंबई बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यामुळे स्वतःचे वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, मुंबई बँकेमार्फत वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल. याशिवाय, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी यांच्यामार्फत ११ टक्के व्याज परताव्याचे अनुदान दिले जाणार आहे. यामुळे कर्ज जवळपास बिनव्याजी होईल, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
छावा राईड ॲपया ॲपसाठी जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्रीआणि छावा राईड अशा नावांचा विचार झाला. सर्वानुमते छावा राईड हे नाव निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेनंतर हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली जातील, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
खासगी कंपन्यांना पर्याय आणि स्थानिकांना संधीमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, छावा राईड ॲपचा मुख्य उद्देश खासगी टॅक्सी सेवा कंपन्यांच्या मक्तेदारीला पर्याय देणे आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. एसटी महामंडळ या ॲपचे संचालन करणार असून, लवकरच याची अंमलबजावणी सुरू होईल. या उपक्रमामुळे मराठी तरुण-तरुणींना स्वावलंबी होण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई बँकेचा पुढाकारमुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी आश्वासन दिले की, बेरोजगार मराठी तरुण-तरुणींना वाहन खरेदीसाठी विशेष आर्थिक पाठबळ दिले जाईल. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन स्थानिक तरुणांना आर्थिक स्थैर्य मिळेल. हा उपक्रम महाराष्ट्रातील वाहतूक क्षेत्रात क्रांती आणण्यासोबतच स्थानिक तरुणांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

IMG-20240817-WA0005

IMG-20240924-WA0354

Screenshot_2025-08-02-19-32-21-78_439a3fec0400f8974d35eed09a31f914

IMG-20230723-WA0310

 

108994866

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp