जयकुमार गोरेंना अडकवण्यात सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा हात; दीडशे फोन कॉल झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
मुंबई : मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख आरोपीच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून आरोपीला फोन केला जात होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रकरण उकरून काढण्यात आले. एका पत्रकारासोबत संपर्क साधत गोरेंना अडकवण्याच प्रयत्न केला आणि याप्रकरणात शरद पवार पक्षाचा मोठा हात आहे. तुषार खरात आणि इतरांनी जयकुमार गोरे प्रकरणात विरोधात व्हिडिओ तयार केल्यानंतर, ते व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले आहेत, असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, आता या प्रकरणाची चौकशी होईल. मात्र, त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. आपण राजकीय शत्रू नाही तर राजकीय विरोधक आहोत. मात्र, अशा प्रकारे कोणाला जीवनातून उठवून टाकायचे, अशा प्रकारचे राजकारण होत असेल तर हे चुकीचे आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सगळे पुरावे सापडले आहेत
ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे. एक ती महिला आहे. दुसरा तुषार खरात आणि तिसरा अनिल सुभेदार आहे. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला. याबाबत सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे व्हाट्सअप वरचे संभाषण सापडले आहे. त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत. कट रचला हे लक्षात आले आहे. पण दुर्दैवाची गोष्टी पुढची आहे की, या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसून आले आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
वाईट वाटतं ते सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे
पुढे बोलताना म्हणाले, मी हे पुराव्यानिशी सांगत आहे. प्रभाकरराव देशमुख हे थेट तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत. मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात यांना गेले आहेत. गोरे यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होणार आहे. हे चाललं काय आहे. आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
दरम्यान, यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे नाव घेतले आहे. तपासासाठी मी तयार आहे. माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे, असे सप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर एका मराठी वृत्त वहिनीला बोलताना सांगितले. .
नेमकं प्रकरण काय?
सातारा जिलह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला होता. तर आपल्याला त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे विवस्त्र फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असाही दावा सदर महिलेने केला होता.
तर होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर गोरे यांना दहा दिवसांसाठी जेलमध्येही जावे लागले, असे या महिलेने एका पत्रात म्हटले होते.

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List