छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर दुबईला फरार?

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत  कोरटकर दुबईला फरार?

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विरोधात अपशब्द वापरणारा प्रशांत कोरटकर गेल्या काही आठवड्यांपासून फरार आहे. धक्कादायक म्हणजे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर फरार झालेला प्रशांत कोरटकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांची वेगवेगळी पथके त्याचा शोध घेत आहेत. पण अद्यापही त्याचा ठोस मागमूस लागलेला नाही. विशेष म्हणजे, न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन फेटाळला असून त्याला मुदतवाढ देण्यासही नकार दिला आहे.
अशातच प्रशांत कोरटकरला कोणतेही कायदेशीर संरक्षण नसतानाही पोलिसांना तो सापडत नसल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसरीकडे प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयात उद्या (२३ मार्च) होणा-या सुनावणीपूर्वीच तो देशाबाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रशांत कोरटकर कोलकातामार्गे दुबईला पळून गेला असून, पळून जाण्यासाठी नागपूर पोलिस दलातील काही वरिष्ठ अधिका-यांनीच त्याला मदत केल्याचाही आरोप केला जात आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर स्वत:च्या शिताफीने नाही, तर पोलिसांच्या आशीर्वादाने फरार झाला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पोलिसांकडून कोणते स्पष्टीकरण दिले जाते आणि न्यायालय यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिस दलातील दोन पथके नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यापैकी एक पथक काल चंद्रपूरमध्ये दाखल झाले. कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी तपास करून कोरटकरचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. एका माहितीनुसार, प्रशांत कोरटकर १९ मार्चपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये थांबला होता. मात्र,१९ मार्चच्या रात्री त्याने हॉटेल सोडले आणि तिथून निघून गेला. पण नागपूरच्या दिशेने न जाता दुसरीकडेच कुठेतरी पसार झाला. कोल्हापूर पोलिसांकडून हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याच्या हालचाली आणि त्याच्यासोबत कोण होते, याचा शोध घेतला जात आहे.
कोल्हापूर पोलिसांचे आरोप : स्थानिक मदतीचा अभावया शोधमोहिमेत कोल्हापूर पोलिसांना स्थानिक यंत्रणेकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. नागपूर आणि चंद्रपूरमधील काही घटक जाणूनबुजून अडथळे आणत आहेत का, याचाही तपास केला जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कुठून तरी कोरटकरला छुपी मदत मिळत आहे का? आणि याचाच फायदा घेत तो पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

जाहिरात

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp