“औरंगजेब नथुराम गोडसेपेक्षा चांगला…” ; अबू आझमींना पाठिंबा देताना स्वामी प्रसाद मौर्य यांचे मोठे विधान
सध्या संपूर्ण देशात मुघल सम्राट औरंगजेब बद्दल वाद सुरू आहे. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबावरील विधानाचे समर्थन केले आहे. त्यांनी भाजपवरही हल्लाबोल केला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी, औरंगजेब नथुराम गोडसेपेक्षा चांगला होता.” असे त्यांनी म्हटले.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी, “भाजप नेते देशात द्वेषाचे बीज पेरत आहेत, ज्यामुळे हिंसाचाराच्या अशा घटना सतत वाढत आहेत.” असा आरोप केला. ते पुढे म्हणाले, ‘जे म्हणतात की औरंगजेब खूप हिंसक होता आणि त्याला सर्वात वाईट राजा मानले जात असे. मला असं म्हणायचं आहे की तो वाईट असेल, पण तो नथुराम गोडसेपेक्षा चांगला होता. नथुराम गोडसेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती. आमचा असा विश्वास आहे की जे इतरांकडे बोट दाखवतात त्यांनी प्रथम स्वतःच्या जीवनात डोकावले पाहिजे. मग दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करावा.” असे म्हणत अबू आझमी यांना समर्थन दिले आहे.
स्वामी प्रसाद मौर्य ने समाजवादी पार्टी के विधायक अबू आजमी के औरंगजेब वाले बयान का समर्थन किया और भाजपा पर हमला बोलते हुए कहा कि भाजपा नेता देश में नफरत का माहौल बना रहे हैं, उन्होंने कहा, “जो लोग औरंगजेब को सबसे हिंसक शासक बताते हैं उन्हें पहले अपने इतिहास पर नजर डालनी चाहिए,
अबू आझमी यांनी काय विधान केले?
समाजवादी पक्षाचे राज्याध्यक्ष अबू आझमी म्हणाले होते की, “औरंगजेबाच्या कारकिर्दीत भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मा (म्यानमार) पर्यंत पोहोचली होती. त्यांनी असेही म्हटले की औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता आणि त्याने अनेक मंदिरे बांधली. औरंगजेब आणि मराठा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील लढाईबद्दल विचारले असता, मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातील आमदाराने ते राजकीय लढाई असल्याचे वर्णन केले होते. त्यांनी असेही म्हटले की आपला जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) जागतिक जीडीपीच्या २४ टक्के होता आणि भारताला (औरंगजेबाच्या कारकिर्दीत) सोन्याची पक्षी म्हटले जात असे.”
महाराष्ट्रात सुरू असलेला वाद काही थांबत नाही. दरम्यान, औरंगजेबाबद्दल सर्व बाजूंनी विधाने येत आहेत. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने (VHP) औरंगजेबाची कबर पाडण्याची घोषणा केली आहे. सोमवारी औरंगजेबाची कबर पाडली जाईल, अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी केली आहे.

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List