सरकारने हिंदी भाषाविरोधाची तामिळनाडूधार केली आणखी तीव्र, आता थेट रुपयाचे चिन्हच बदलले

तामिळनाडू सरकारने हिंदी भाषाविरोधाची धार केली आणखी तीव्र, आता थेट रुपयाचे चिन्हच बदलले

 सरकारने हिंदी भाषाविरोधाची तामिळनाडूधार केली आणखी तीव्र, आता थेट रुपयाचे चिन्हच बदलले

गेल्याकाही दिवसांपासून तामिळनाडूमधील स्टॅलिन सरकारने केंद्र सरकारच्या कथित हिंदी लादण्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्राद्वारे केंद्र सरकार हिंदी लादत असल्याचा आरोप सरकारने केला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये हिंदी भाषा सुरू करण्यास सरकारकडून नकार देण्यात आला आहे. त्यातच आता तामिळनाडू सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील ₹ चे चिन्ह तमिळ भाषेत बदलले आहे.
तामिळनाडूमध्ये सध्या द्रमुकचे सरकार आहे. सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात ‘₹’ चिन्हाऐवजी ‘ரூ’ चिन्ह वापरले आहे. हे चिन्ह तमिळ लिपीतील ‘रु’ अक्षर आहे. चिन्हात केलेल्या बदलांबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

गेल्या एका दिवसांपासून केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये हिंदीवरून वाद सुरू आहे. केंद्र सरकार नवीन शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा धोरण लागू करण्यास सांगत आहे. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, त्यात स्थानिक भाषा देखील समाविष्ट आहे. मात्र. तामिळनाडू सरकारचा हिंदी भाषेला विरोध आहे. स्टॅलिन यांनी एनपीईला ‘भगवे धोरण’ म्हटले आहे.
शिक्षण धोरणाबाबत बोलताना स्टॅलिन म्हणाले की, ‘एनईपी हे शिक्षण धोरण नाही, तर भगवे धोरण आहे. त्याचा उद्देश भारताचा विकास करणे नाही तर हिंदीचा विकास करणे हा आहे. आम्ही NEP ला विरोध करतो. कारण यामुळे शिक्षण क्षेत्रातील तामिळनाडूची प्रगती पूर्णपणे नष्ट करेल.’
आता राज्याच्या अर्थसंकल्पातून थेट रुपयाचे चिन्हच बदलण्यात आल्याने याची चर्चा होत आहे. भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी देखील यावरून मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला आहे. देशभरात या चिन्हाचा वापर केला जातो. हे चिन्ह बदलण्याएवढे कोण मूर्ख कसे असू शकते? असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

 

 

 

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp