मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस मधुकरराव (अण्णा मुळे) यांचे दुःखद निधन

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस मधुकरराव (अण्णा मुळे) यांचे दुःखद निधन

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस, मराठवाडा साहित्य परिषदेचे विश्वस्त, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सदस्य तथा प्रसिद्ध उद्योगपती मधुकरअण्णा मुळे यांचे मंगळवारी प्रदिर्घ आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारे मुळे हे शैक्षणिक क्षेत्रात अण्णा म्हणून ओळखले जायचे.

मधुकरअण्णा मुळे यांना त्यांच्या सामाजिक उपक्रमांसाठी आणि महाराष्ट्रातील शेतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनेक पुरस्कार मिळालेत. ते ग्रीन गोल्ड सीड्सचे संस्थापक अध्यक्ष देखील होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे मधुकर अण्णा मुळे हे विश्वस्त मंडळाचे चेअरमन होते. त्यांचाच काळात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह झाले. त्यांनी यासाठी शरद पवारांच्या मदतीने मसापला निधी मिळवून दिला. 1988 ते 2013 पर्यंत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस होते.

मधुकरअण्णा मुळेंच्या काळात MSPM ची भरभराट

मधुकरअण्णा मुळे यांच्या काळात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची भरभराट झाली. त्यांच्याच कार्यकाळात 77 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देवगिरी महाविद्यालयात पार पडले. यावेळी मुळे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. 2009 साली MSPM चा सुवर्णमहोत्सव तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी देखील अण्णा मुळे स्वागताध्यक्ष होते.

11 वे जागतिक मराठी साहित्य संमेलन 'शोध मराठी मनाचा' 2011 साली पार पडले. त्या कार्यक्रमाचेही स्वागताध्यक्ष म्हणून अण्णा यांनी काम पाहिले. महाराष्ट्राची सिंहावलोकन परिषद पार पडली त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती लाभली होती. अण्णा मुळे यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे स्वतंत्र साहित्य संमेलनही सुरू केले होते.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे जे काही पुस्तक प्रकाशित झाले त्याचा संपूर्ण खर्च हा मंडळाने केला होता. तसेच 'आशय' नामक त्रैमासिकही त्यांनी सुरू केले होते. अण्णा मुळे यांच्या कार्यकाळातत महाराष्ट्र शासनाचा MSPM ला उत्कृष्ट शिक्षण पुरस्कार मिळाला होता.

अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार सतीश चव्हाण यांनी मधुकरअण्णा मुळे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सतीश चव्हाण म्हणाले, मधुकरराव (अण्णा) मुळे यांच्या निधनाचे वृत्त मनाला वेदना देणारे आहे. माझे वडील स्व.भानुदासराव चव्हाण व मुळे अण्णा यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे साहजीकच आमच्या कटुंबाचे ऋणानुबंध फार जुने आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाला राज्यभरात वेगळी ओळख निर्माण करून देण्यात आदरणीय मुळे अण्णांचे योगदान कदापी विसरता येणार नाही. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच साहित्य, सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेले एक अभ्यासू व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा भावना व्यक्त करत सतीश चव्हाण यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

 

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp