विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ; जाणून घ्या सर्व मुद्दे
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईत पक्षाचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे. भाजपने राज्यातील शेतकरी, तरुण, वृद्ध आणि महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. महायुतीची सत्ता आल्यास पहिल्या 100 दिवसांत ‘व्हिजन महाराष्ट्र 2029’ हा रोडमॅप तयार करुन त्यानुसार वाटचाल केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.
या जाहीरनाम्यामध्ये वृद्ध पेन्शन धारकांना २१०० देण्याचे वचन देण्यात आले आहे. महाराष्ट्रात २०२७ पर्यंत ५० लाख लखपती दीदी करणार, महारथीमार्फेत मोठ्या लॅब तयार करणार, गड किल्ल्यांच्या विकासासाठी प्राधिणीकरण, १ लाखांपेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या देणार आहोत.
अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण देणार, २५ लाख रोजगार निर्मिती करणार, महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन देणार अशी आश्वासनं भाजपच्या या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आली आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासने कोणती ?
– लाडकी बहीण योजनेतील महिलांना १५०० रुपयांवरुन २१०० रुपये दिले जाणार– महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण– महिलांच्या सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार– शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२००० रुपयांवरून १५००० रुपये– एमएसपीशी समन्वय साधत २० टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल.– प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार– वृद्ध पेन्शन धारकांना १५०० वरुन २१०० रुपये दिले जाणार– जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार– २५ लाख रोजगार निर्मिती करणार– महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन– ग्रामीण भागात ४५ हजार गावात पांधण रस्ते बांधणार– महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करण्यात येणार– छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार. यात को वर्किंग स्पेस, इनक्युबेशन सुविधा असतील. यातून १० लाख नवीन उद्योजक तयार केले जाणार आहे.– अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढ करुन त्यांना दर महिना १५ हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार– वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार– सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र @२०२९ सादर केले जाणार– २०२८ पर्यंत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य– मेक इन महाराष्ट्र धोरण राबवणार– महाराष्ट्राला जागतिक फिनटेक आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) राजधानी बनवणार– पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करणार– नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवणार– शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील जीएसटी अनुदानाच्या रुपात परत देणार– शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६००० भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापन– २०२७ पर्यंत महाराष्ट्रात ५० लक्ष लखपती दीदी तयार करणार प्रत्येकी ५०० स्वयंसहायता गटाचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि १००० कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येणार– अक्षय अन्न योजनेतंर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा देण्यात येणार, यात तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असणार– महारथी अटल टिंकरिंग लॅब्स योजना सुरु करणार.
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List