खळबळजनक ! भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या
राज्यात एकीकडे निवडणुकीचे वातावरण असताना दुसरीकडे सांगलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीतील मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडेंची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता सांगलीत आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मिरज-पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली होती. प्राथमिक माहितीनुसार, मालमत्तेच्या कारणातून ही हत्या झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. 2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. सध्या खाडे भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते.
2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली
मीरज-पंढरपूर रस्त्यावर सुधाकर खाडे यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. खाडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली होती. खाडे यांनी 2014 साली तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
पोलिसांकडून एकाला अटक या प्रकरणाशी निगडित पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला. कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडे यांना जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केले. सदर घटनेबाबत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.
आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List