बंडात सहभागी होऊनही शिंदेंनी घात केला, उद्धव ठाकरे देव माणूस होते; उमेदवारी न दिल्याने आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात
शिंदे गटाने केलेल्या बंडात शिवसेनेचे 40 आमदार त्यांच्या सोबत होते , त्यापैकी 39 जणांना उमेदवारी देण्यात आली मात्र पालघर मतदार संघातील आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारली त्या ठिकाणी राजेंद्र गावित यांना शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आमदार श्रीनिवास वनगा हे दुःखी झाले असून कालपासून अन्न पाण्याला हात लावला नाही ते मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचले आहेत, आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत अशी माहिती त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी दिली.
आमदार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी म्हणाल्या, बंडात सहभागी होताना कुठल्याही आमदाराला घरी बसवणार नाही, प्रत्येकाला निवडून आणू असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले होते परंतु आता तो शब्द त्यांनी पाळला नाही. माझे पती कुणाशीही बोलत नसून आत्महत्या करणार असेच म्हणत आहेत.उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव होते एकनाथ शिंदे वर मी विश्वास ठेवला ही चूक झाली असे म्हणत आहेत. माझ्या पतीचे काय चुकले असा सवाल वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. माझ्या पतीचे काही बरे वाईट झाल्यास मी कुणाला जबाबदार धरू असा सवाल ही त्यांनी केला आहे.
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List