संभाजीनगर 'मध्य'चे उद्धव ठाकरेंचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांची माघार

संभाजीनगर 'मध्य'चे उद्धव ठाकरेंचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांची माघार

उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी पक्षाला तिकीट परत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून प्रदीप जैस्वाल यांना तिकीट मिळाले आहे. तर उद्धवसेनेने या ठिकाणी किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता तनवाणी यांनी माघार जाहीर केली आहे. उद्धव सेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र, यासंबंधी किशनचंद तनवाणी यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.

याबाबत किशनचंद तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की,

QuoteImage

मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मी स्वत: प्रदीप जैस्वाल यांच्याकडे गेलो होतो. त्यांना आम्ही यापूर्वीच्या निवडणुकीत मदत केली होती. त्याची आठवणही करून दिली. त्यांच्याकडून यावेळी मदतीची अपेक्षा होती. परंतु ते म्हणतात की, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, त्यांना बोला. शेवटी ही निवडणूक आहे. शहरावर 2014 सारखी (जलील विजयी झाले होते) परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून हिंदुत्वासाठी मी हा निर्णय घेतला आहे.

QuoteImage

यावर पत्रकारांनी सवाल केला की, 2014 किंवा 2019 असा प्रश्न येत नाही, इथे तुमचे कौशल्य पणाला लागणार होते. तुम्ही काही अंदाज घेतलाय का, ज्यामुळे तुम्ही माघार घेतली किंवा मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर दबाव आणलाय का? यावर तनवाणी म्हणाले की,

QuoteImage

माझी दोन्ही मुले सुशिक्षित बिझनेसमन आहेत, माझ्या संस्था, शाळा आहेत. इतर व्यवसायही आहेत. त्यामुळे माझ्यावर कोणीही कसलाही दबाव आणलेला नाही, आणू शकत नाही. निवडणुकांमुळे वेगवेगळे अंदाज येत असतात, अजून तर प्रचारही सुरू झालेला नाही. यामुळे अंदाज यायचं आताच काही कारण नाही. पण आता 7 दिवस मी फिरलो, तेव्हा 2014 सारखी परिस्थिती पुन्हा होईल असे मला वाटले. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.

QuoteImage

कोण आहेत तनवाणी?

गेल्या ३२ वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेल्या तनवाणींना महापौर, विधान परिषदेवर आमदारपदाची संधी मिळाली. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे विधानसभा लढणार. त्यात आपल्याला तिकीट मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे लक्षात आल्यावर ते भाजपमध्ये गेले. औरंगाबाद मध्यमधून पराभूत झाले. तनवाणी आणि जैस्वाल यांच्यात हिंदुत्ववादी मतांची फाटाफूट झाल्याने एमआयएमचे इम्तियाज जलील आमदार झाले, तर तनवाणींनी भाजपमध्ये जोमाने काम सुरू केले. पण काही महिन्यांतच तेथेही त्यांच्याविरोधात मूळ भाजपवासी सक्रिय झाले. तरीही २०१९ मध्ये युतीची सत्ता येईल या अपेक्षेने तनवाणी भाजपमध्येच टिकून राहिले. मात्र, भाजपला वगळून दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे तनवाणी स्वगृही परतले.

मध्य मतदारसंघात मराठा, मुस्लिम, दलितांच्या मतांवर भिस्त

मध्य मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एमआयएमचा मराठवाड्यातील पहिला आमदार याच मतदारसंघातून निवडून आला. त्यामुळे मुस्लिम, मराठा, दलित या मतांची संख्या या निवडणुकीचे गणित बदलणारी आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना इथे ८५,९३७ मतदान मिळाले होते. हे मतदान मध्यमध्ये गेल्या तिन्ही विधानसभा जिंकणाऱ्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त होते. त्यामुळे एमआयएमच्या वतीने नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मराठा समाजाची मते मिळावीत यासाठीच उद्धवसेनेचे किशनचंद तनवाणी यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. परंतु किशनचंद तनवाणी यांच्या माघारीच्या शक्यतेने विविध चर्चांना उधाण आले आहे. मध्य मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, एमआयएमचे नासेर सिद्दिकी असा सामना रंगणार होता. यासह वंचित आणि इतर पक्षाचे उमेदवारही यामध्ये आणखी रंगत वाढवणार आहेत.

मध्यमध्ये सर्वाधिक मुस्लिम मतदार

शहरात सर्वाधिक मुस्लिम मतदारांची संख्या मध्य मतदारसंघात आहे. येथे १ लाख २० हजार मतदार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे लोकसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांना याच मध्य मतदारसंघात ८५,९३७ मते मिळाली होती. २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या मतांपेक्षा हे मतदान जास्त आहे. २००९ मध्ये अपक्ष उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी विजय मिळवला होता. त्या वेळी त्यांना ४९,९६५ मते मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सय्यद अब्दुल कदीर यांचा ८,३८४ मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये प्रदीप जैस्वाल मध्य मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यांना ४१,८६१, तर इम्तियाज जलील यांना ६१,४८१ मते मिळाली होती. मात्र २०१९ मध्ये ८२,२१७ मते घेत प्रदीप जैस्वाल विजयी झाले होते. त्यांनी एमआयएमच्या नासेर सिद्दिकींचा १३,८९२ मतांनी पराभव केला होता.

मराठा व ओबीसीमध्ये होणार मतविभागणी

या मतदारसंघात यापूर्वीच्या तिन्ही विधानसभा निवडणुकीत हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी पारंपरिक लढत होते. मात्र जरांगेंच्या आंदोलनामुळे हिंदूंमधल्या मराठा व ओबीसी यामध्येदेखील विभागणी झाली आहे. या मतदारसंघात ३५ हजार मराठा मतदान आहे. त्यामुळेच उद्धवसेनेचे किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांची सदिच्छा भेट घेतली होती.

दलितांचे ५० हजार मतदान निर्णायक

या मतदारसंघात जवळपास ५० हजार मतदान दलित समाजाचे आहे. त्यामुळे मुस्लिम, दलित मतदान एकत्र आले तर या मतदारसंघाचे चित्र बदलते. वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांना २०१९ मध्ये २७,०३२ मते मिळाली होती. हे प्रमाण १४ टक्के इतके होते.

जाहिरात                   IMG-20240920-WA0276                     IMG-20240920-WA0279            IMG-20240817-WA0005

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp